तरुण भारत

कोविड-19 : नव्या औषधाला मंजुरी

‘गेमचेंजर’ ठरणार : गंभीर रुग्णांच्या उपचारात वापर होणार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतात कोरोना विषाणूच्या संसर्गावरील उपचाराकरता आणखी एका औषधाला मंजुरी मिळाली आहे.  हेटेरो या औषध कंपनीने कोविड-19 च्या उपचारासाठी इन्व्हेस्टिगेशनल अँटीव्हायरल ड्रग रेमडेसिवीर बाजारात आणणार असल्याची घोषणा रविवारी केली आहे.

या औषधासाठी ड्रग कंट्रोल जनरल ऑफ इंडियाकडून कंपनीला मंजुरी मिळाली आहे. हे औषध भारतात ‘कोविफॉर’ नावाने विकले जाणार आहे. तर ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सला कोरोनावरील उपचाराकरता फेविपिराविरची जेनेरिक आवृत्ती सादर करण्यास शनिवारी मंजुरी मिळाली आहे.

हेटेरो कंपनीनुसार डीजीसीआयने कोविड-19 च्या संशयास्पद आणि पॉझिटिव्ह रुग्णांच्या उपचाराकरता कोविफॉर या औषधाच्या वापराला संमती दिली आहे. गंभीर आजारी असलेल्या रुग्णांना हे औषध दिले जाणार आहे. भारतात कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता कोविफॉरला मिळालेली मंजुरी गेमचेंजर ठरू शकते. या औषधाच्या चाचण्यांचे निष्कर्ष सकारात्मक आहेत. देशभरातील रुग्णांना त्वरित हे औषध पुरविण्याची तयारी असल्याचे हेटेरो कंपनीने म्हटले आहे.

फेविपिराविरही उपलब्ध

ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सने फेविपिराविरला फॅबिफ्ल्यू नावाने सादर केले आहे. 34 टॅबलेटची एक स्ट्रिप 3,500 रुपयांना मिळणार आहे. म्हणजेच एक टॅबलेट सुमारे 103 रुपयांना पडणार आहे. परंतु हे औषध कोविड-19 च्या सौम्य लक्षणे दिसून येणाऱया रुग्णांच्या उपचारासाठी मंजूर करण्यात आले आहे.  विषाणूचा

100एमजीचे इंजेक्शन

कोविफॉर औषध 100एमजीच्या वायल (इंजेक्टेबल) मध्ये उपलब्ध होईल. डॉक्टर किंवा आरोग्य कर्मचाऱयाच्या देखरेखीत नसांमध्ये हे इंजेक्शन टोचून घ्यावे लागणार आहे. कंपनीने या औषधासाठी अमेरिकेच्या गिलिड सायन्सेसशी करार केला आहे. हेटेरो ग्रूप ऑफ कंपनीने देशांतर्गत गरज भागविण्याची पूर्ण तयारी असल्याचे जाहीर केले आहे.

Related Stories

आसाममध्ये काँग्रेसचे दोन आमदार भाजपमध्ये दाखल

Patil_p

57 कैद्यांची जामिनावर मुक्तता

Patil_p

अत्याचार पीडितेची ओळख जाहीर करणे चुकीचे

Patil_p

आयटीबीपीच्या श्वानपथकात 16 नवे सदस्य

Omkar B

डिफेन्स एक्स्पोमध्ये 71 सामंजस्य करार

Patil_p

चिनी वस्तूंवर सीमा शुल्क वाढविण्याचा सरकारचा विचार

datta jadhav
error: Content is protected !!