तरुण भारत

जिल्हाबंदी उल्लंघनप्रकरणी मालगावात 11 जणांवर गुन्हा

प्रतिनिधी/ सातारा

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अद्यापही जिल्हा बंदीचा आदेश लागू असून त्याचे उल्लंघन करत पुणे व मुंबई ते सातारा विनापरवानगी प्रवास करुन आरफळ व मालगाव, (ता.सातारा) येथे आलेल्या 11 जणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisements

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 8 ते 17 जून या कालावधीत मालगाव, (ता.सातारा) येथे सचिन प्रकाश ढाणे (रा. पुणे), शामराव जनार्दन दळवी, मंजुळा शामराव दळवी, सचिन शामराव दळवी, अंकिता सचिन दळवी (सर्व रा. धारावी, मुंबई), तसेच संपत पांडुरंग कुंभार, रेखा संपत कुंभार (रा. डोंबवली), फिरोज हमीत शेख, सलमा फिरोज शेख, समीर युसूफ शेख (रा. मुंबई) हे सर्वजण विनापरवानगी आरफळ व मालगाव येथे येवून राहिले होते.

याबाबत सरपंच विलास कदम, पोलीस पाटील रमेश मोझर, ग्रामविकास अधिकारी ए. आर. कुंभार यांनी ते आलेल्या ठिकाणी जावून खात्री केली असता हे सर्वजण विनापरवानगी गावी येवून राहिले होते. त्यांनी याबाबत पोलीस ठाण्यास कळवल्यानंतर पोलीस हवालदार महेश कदम यांनी त्यांच्याविरुध्द फिर्याद दिली असून त्यांच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार मोरे करत आहेत.

Related Stories

गांजा विक्री करणाऱ्या महिलेला वाई न्यायालयाने सुनावली दोन दिवस पोलीस कोठडी

Abhijeet Shinde

ट्रकमधून 18 लाख रुपयांची वेलची लंपास

Patil_p

तेजोमय इतिहासाचा साक्षीदार किल्ले सज्जनगड मशालोत्सवाने उजळला

datta jadhav

”देवेंद्र फडणवीस माझ्यावर टीका करतात कारण त्यांना असं वाटतं माझ्यामुळे त्यांची सत्ता गेली”

Abhijeet Shinde

प्रवासी घटल्याने महालक्ष्मी एक्सप्रेस रद्द

Abhijeet Shinde

साताऱयातील पाच ज्वेलर्स चालकावर गुन्हा

Patil_p
error: Content is protected !!