तरुण भारत

सोशल डिस्टन्स पाळत योग दिन साजरा

प्रतिनिधी/ बेळगाव

आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून शहराच्या विविध भागामध्ये योग प्रात्यक्षिके करण्यात आली. यावषी कोरोनाचे संकट असल्यामुळे योगा फ्रॉम होम ही संकल्पना राबविण्यात आली. नागरिकांनी घरीच राहून योग दिनानिमित्त आपल्या कुटुंबीयांसमवेत योगासने केली. काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळत योग दिन साजरा झाला.

Advertisements

यावषी संपूर्ण जगभर कोरोनाचे संकट पसरले आहे. त्यामुळे प्रतिवर्षाप्रमाणे एकत्र येऊन योगासने करणे शक्मय नव्हते. त्यामुळे प्रशासनाकडून योगा फ्रॉम होम ही संकल्पना मांडण्यात आली होती. स्वत:बरोबरच इतरांची काळजी घेण्याच्यादृष्टीने नागरिकांनी ही संकल्पना अंमलात आणली. त्यामुळे यावर्षी सार्वजनिक कार्यक्रम न करता कुटुंबासमवेत योग दिवस साजरा करण्यात आला.

मराठा मंदिर येथे पार पडला योग दिन

मराठा मंदिर येथे प्रतिवर्षाप्रमाणे यावषीही आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. एकूण 75 नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळत या ठिकाणी योगसाधना केली. तज्ञ मंडळींच्या उपस्थितीत अनेकांना योगासने शिकविण्यात आली. यावेळी विविध प्रकारची योगासने व त्यांची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली.

मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये योग दिन साजरा

बेळगावच्या मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये सहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जवानांना प्राणायामविषयीची माहिती देण्यात आली. जवानांना शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा सक्षम ठेवण्यासाठी योग अत्यावश्यक आहे, असे यावेळी सांगण्यात आले. यावेळी प्रशिक्षणार्थी जवान, मराठा लाईट इन्फंट्रीचे अधिकारी उपस्थित होते.

नागरिकांनी अनुभवला ई-योगा

कोरोनाचा धोका असल्यामुळे घरीच राहून योग दिवस साजरा करावा, असे सांगण्यात येत होते. त्यानुसार नागरिकांनी आपापल्या घरांमध्ये योगदिन साजरा केला. अनेक संस्थांनी ऑनलाईन योगा करत ई-योगाचा आनंद अनुभवला. ऑनलाईनच्या माध्यमातून योगासनाची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. 

Related Stories

गॅसवाहिन्या-जलवाहिन्या एकाचवेळी घालण्यासाठी समन्वयाची गरज

Patil_p

रोटरी क्लब बेळगावतर्फे आरोग्य खात्याला 250 फूट सॅनिटायझर्स मशीन्सची देणगी

Patil_p

कारची दुचाकीला धडक; मामा-भाची ठार

Patil_p

बेळगावातून महाराष्ट्रात दररोज धावताहेत 49 बसेस

Patil_p

बारावीच्या परीक्षेबाबत अद्याप संभ्रम

Amit Kulkarni

राज्य शासनाकडून कॅन्टोन्मेंटला 16 लाखाचे अनुदान

Omkar B
error: Content is protected !!