तरुण भारत

जगभरात 90 लाखांहून अधिक कोरोनाबाधित

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

जगभरात आतापर्यंत 90 लाख 50 हजार 891 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 4 लाख 70 हजार 795 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

Advertisements

जगभरातील 90.50 लाख बाधितांपैकी 48 लाख 41 हजार 935 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अजूनही 37 लाख 38 हजार 161 ॲक्टिव्ह केसेस असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामधील 54 हजार 734 केसेस गंभीर आहेत.  

सर्वाधिक कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत अमेरिका पहिल्या स्थानावर आहे. अमेरिकेत आतापर्यंत 23 लाख 56 हजार 657 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 1 लाख 22 हजार 247 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर ब्राझीलमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. ब्राझीलमध्ये 10 लाख 86 हजार 990 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 50 हजार 659 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलनंतर रशिया तिसऱ्या स्थानावर आहे. रशियात 5 लाख 84 हजार 680 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 8 हजार 111 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

Related Stories

गूढ स्थितीत बुडाली इराणची सर्वात मोठी युद्धनौका

Patil_p

टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेला उद्यापासून प्रारंभ

Patil_p

रोजगाराचे संकट

Patil_p

दहशतवाद्यांसाठी मोबाईल टॉवर वाढवतोय पाकिस्तान

Patil_p

‘या’ देशात बलात्काऱ्यांना करणार नपुंसक

datta jadhav

महाराष्ट्रातील पोलीस भरतीतील 13 % जागा मराठा समाजासाठी : अनिल देशमुख

Rohan_P
error: Content is protected !!