तरुण भारत

दोन्ही टोळीतील गुंडांची धरपकड सुरू

अटकेतील 9 जणांना 7 दिवस पोलीस रिमांड : सांताक्रूझ गँगवॉर प्रकरण

प्रतिनिधी / पणजी

Advertisements

शनिवारी सांताक्रूझ येथे झालेल्या गँगवॉर प्रकरणी जुने गोवे पोलिसांनी गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांकडे मदत मागितली असून बेपारी आणि मार्सेलिनो टोळीतील गुंडांची धरपकड सुरू केली आहे. शनिवारी अटक करण्यात आलेल्या 9 जणांना 7 दिवस पोलीस रिमांड घेण्यात आला आहे.

ताळगाव आणि सांताक्रूझ या दोन गटात गेल्या अनेक वर्षांपासून वैमनस्य आहे. त्यांच्यामधील चकमकीची प्रकरणे अधूनमधून उघड होत होती. इम्रान बेपारी हा कोठडीत होता. त्याला बाहेर आल्यावर ठार केले जाईल, अशी माहिती सीआयडीला मिळाली होती. काही महिन्यांपूर्वी इम्रानच्या फोटोसह एक संदेश समाजमाध्यमांवर फिरत होता.

काही आठवडय़ांपूर्वीच इम्रान जामिनावर सुटला होता. त्यानंतर फोनवरून दोन्ही गटांत एकमेकांना आव्हाने देऊन उसकावण्याचे प्रकार चालू होते, अशी माहिती गुन्हा अन्वेषण विभागातील सुत्रांनी दिली.

ताळगावच्या पार्टीत रचला कट

इम्रानला ठार मारण्याचा कट शुक्रवारी रात्रीच ताळगांव येथे चाललेल्या पार्टीत रचण्यात आला होता. तो सापडला नाही तर त्याच्या गाडय़ा फोडून दहशत निर्माण करून परत यायचे, असे त्यांच्यात ठरले होते, त्याप्रमाणे हत्यारे घेऊन ते सांताक्रूझ येथे इम्रानच्या घरी निघाले होते.

अवघ्या काही मिनिटांचा खेळ

या हल्ल्याची सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाली आहे. त्याप्रमाणे अवघ्या तीन चार मिनिटात दहशत निर्माण करून कारच्या काचा फोडून व कारवर गोळ्या झाडून हल्लेखोर पसार झाले. परंतु कारवर झाडलेली एक गोळी रिबाऊंड होऊन हल्लेखोर टोळीमधील सोनू यादव याच्या पोटात घुसली. त्यामुळे सर्वांनी तेथून पसार होण्याचा निर्णय घेतला.

…तर सोनू वाचला असता

सोनू हा दुचाकीच्या मागे बसला होता. रक्तस्त्राव होत असल्याने विव्हळत होता. मागे त्याचा तोल जात असल्याचे जाणवल्याने स्कुटर चालकाने त्याला गोमेकॉत नेण्यासाठी दुचाकी हमरस्त्यावर घेतली. मेरशीला जाणाऱया रस्त्यावर असलेल्या ओव्हरब्रिजच्या खाली सोनूला ठेवले व सदर संशयित ताळगाव येथे चाललेल्या पार्टीच्या ठिकाणी गेला. तिथे त्याने एका स्कुटरवर दोघांना यायला सांगितले. मेरशी जंक्शनवर ओव्हरब्रिजच्या खाली सोनू तोपर्यंत मृत झाला होता. तरीही त्या दोघांनी त्याला स्कुटरच्या मागे बसवून गोमेकॉत नेले. मोटरसायकलवरील संशयित मात्र फरार झाला. त्याने आधीच त्याला गोमेकॉत नेले असते तर त्याचे प्राण वाचले असते, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

सदर मोटरसायकल चालक अजून पोलिसांना सापडलेला नाही.

सांताक्रूझला पोलीस आऊटपोस्टची गरज

सांताक्रूझ व मेरशी भाग पुर्वीपासून गुंडगिरीसाठी संवेदनशील आहे. मात्र पोलीस स्थानक जुने गोवे येथे आहे. या भागासाठी गस्त ठेवण्यास व जनतेमध्ये सुरक्षेची भावना निर्माण करण्यासाठी मेरशी व सांताक्रूझमध्ये किमान पोलीस आऊटपोस्ट ठेवण्याची गरज व्यक्त होत आहे. जुने गोवे पोलीस स्थानकातील 24 पोलिसांना चिंबल येथे प्रभाग 5 मध्ये मायक्रो कंटेनमेंटच्या पाळतीवर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे मेरशी व सांताक्रूझ मधील रात्रीची गस्त हटविण्यात आली होती, अशी माहिती जुने गोवे पोलिसांनी दिली.

Related Stories

विधानसभा अधिवेशन घेऊन विविध प्रश्नांवर चर्चा घडवावी

Patil_p

ज्येष्ठ पत्रकार किशोर कोलगे यांचे निधन

Amit Kulkarni

लवकरच म्हादई बचाव मेराथॉन

Patil_p

फोंडा शहरातील सार्वजनिक गणपतींचे दीड दिवसांत विसर्जन

Patil_p

मनुष्याने धर्माचरणी जीवन जगणे हाच ब्रह्मानंद स्वामींचा उपदेश : सद्गुरु ब्रह्मशानंदाचार्य

Amit Kulkarni

भुईपाल येथील जीपगाडी–स्कुटर अपघातात एक गंभीर जखमी

Amit Kulkarni
error: Content is protected !!