तरुण भारत

रत्नागिरीत कोरोनाचे आणखीन दोन बळी

प्रतिनिधी / रत्नागिरी

आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्हा कोव्हीड रुग्णालयामध्ये २ रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये शिरगाव ता. रत्नागिरी येथील पुरुष रुग्णाला (वय ६५) किडनी व मधुमेहाचा आजार होता तसेच काडवली संगमेश्वर येथील महिला रुग्ण (वय ४२) यांचा उपचारादरम्याने मृत्यू झाला. दोन्ही रुग्णांचा मुंबई प्रवासाचा इतिहास होता. या दोन रुग्णांमुळे जिल्ह्यात कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या २१ झाली आहे.

Advertisements

रत्नागिरी जिल्ह्यात २ दिवसात ४ जणांचे कोरोनाने मृत्यू झाले आहे. यामध्ये २ महिला आणि २ पुरुष रुग्णांचा समावेश आहे. आज कोव्हीड केअर सेंटर समाजकल्याण रत्नागिरी येथून २ रुग्णांना तर जिल्हा कोव्हीड रुग्णालय येथून २ रुग्ण असे एकूण ४ रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

जिल्ह्यातील कोरोनाची सद्यस्तिथी
एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ४८४
एकूण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह १११
बरे झालेले रुग्ण ३५३
मृत्यू २१

Related Stories

रेडझोनमध्ये सिंधुदुर्ग सातव्या क्रमांकावर

NIKHIL_N

न.पं.च्या गणेशोत्सव नियमांची 17 ऑगस्टपासून अंमलबजावणी!

NIKHIL_N

रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना बाधितांनी ओलांडला 2 हजारांचा टप्पा

triratna

स्वीडनने स्वीकारली ‘नवी वाट’

NIKHIL_N

दापोलीत बिबटय़ाची दुचाकीस्वारावर झडप

Omkar B

रत्नागिरी : घरबसल्या युट्यूबव्दारे सोळजाईचे दर्शन

triratna
error: Content is protected !!