तरुण भारत

राजस्थान : खाजगी रुग्णालय आणि लॅबमध्ये होणार 2200 रुपयांमध्ये कोरोना टेस्ट

ऑनलाईन टीम / जयपूर : 


राजस्थानमधील खाजगी रुग्णालयात आणि लॅबमध्ये कोरोना चाचणीसाठी 4500 रुपये आकारले  जात होते. मात्र ही किंमत सामान्य जनतेला परवड नसल्याने हे दर रद्द करून नवीन दर आकारण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले होते. त्यानुसार आता राजस्थानमध्ये 2200 रुपये दर आकारण्यात आला आहे.

Advertisements

 
याबाबत अधिक माहिती देताना अतिरिक्त मुख्य सचिव रोहित कुमार सिंह यांनी सांगितले की, या निर्णयामुळे आता खाजगी लॅबमध्ये कोरोनाची चाचणी केवळ 2 हजार 200 रुपयांमध्ये केली जाणार आहे. 


पुढे ते म्हणाले, राज्यात 20 राजकीय चिकित्सा संस्थांमध्ये कोरोनाची तपासणी निःशुल्क केली जात आहे. तसेच एनएबीएल मान्यताप्राप्त आयसीएमआरकडून मंजुरी देण्यात आलेल्या चार खाजगी लॅबमध्ये कोरोनाची चाचणी केली जात आहे. तसेच या निर्णयानंतर देखील खाजगी लॅब कडून अधिक दर आकारला गेल्यास संबधित लॅब वर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

Related Stories

”देशाला मृत्यूच्या खाईत लोटनाऱ्या मोदींनी नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा द्यावा”

Abhijeet Shinde

रशियातील व्हिक्टरी परेडमध्ये फडकला तिरंगा

Patil_p

कर्नाटकातून येणाऱ्यांची होणार महाराष्ट्राच्या सीमेवर तपासणी: जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Abhijeet Shinde

लिम्पिआधुरा, लिपुलेख आणि कालापानी हे नेपाळचेच भाग; नेपाळचा दावा

datta jadhav

गोवा : काँग्रेसकडून आलेक्स रेजिनाल्ड यांचा पत्ता कट

Sumit Tambekar

भाजपच्या सावित्री कवळेकर अपक्ष लढणार

Sumit Tambekar
error: Content is protected !!