तरुण भारत

सोलापूर ग्रामीणमध्ये आज 8 कोरोनाबाधितांची भर

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात  सोमवारी नव्याने 8 कोरोना बाधीत रुग्णांची भर पडली तर बाधित रुग्णामध्ये 8 पुरुषांचा समावेश आहे. आतापर्यंत 11 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे . आतापर्यंत 87 रुग्ण बरे होऊन घरी गेली आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 204 कोरोबधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 106 रुग्णांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी सोमवारी दिली. 

Advertisements

 पॉझिटिव्ह रुग्णामध्ये अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव, सलगर वस्ती,  करजगी प्रत्येकी एक उल्हासनगर 2, मैंदर्गी 1, बुधवार पेठ 1, झरे तालुका करमाळा एक याठिकाणी  पॉझिटिव्ह रुग्ण आढळली आहे. आज 107 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील  8 पॉझिटीव्ह तर 99 अहवाल निगेटिव्ह आले. अद्याप 29  अहवाल प्रलंबित आहेत. 204 रुग्णांपैकी 128 पुरुष 76 स्त्री आहेत. तालुक्यात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 87  जण बरे होऊन घरी गेली आहेत. 


कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे
अक्कलकोट  –  37
बार्शी –       30
माढा-         7
माळशिरस – 5
मोहोळ-       10
उत्तर सोलापूर – 13
करमाळा-   1
सांगोला      –   3
पंढरपूर           7 
दक्षिण सोलापूर – 91
एकूण –         204
होम क्वांरटाईन – 2274


आजपर्यंत तपासणी केलेली व्यक्ती- 2768
प्राप्त अहवाल- 2739
प्रलंबित अहवाल- 29
एकूण निगेटिव्ह – 2536
कोरोनाबाधितांची संख्या- 204
रुग्णालयात दाखल – 106
आतापर्यंत बरे – 87
मृत – 11

Related Stories

सदर बाजार परिसरात पाण्याचा ठणाणा

Patil_p

सांगली : नळाचे पाणी बंद केल्याने कुटुंबाला मारहाण

Abhijeet Shinde

शिवसेना पदाधिकाऱ्याच्या पत्नीची विहीरीत उडी मारुन आत्महत्या

Abhijeet Shinde

वाई शहरातील बाधित महिलेचा मृत्यू

Patil_p

देशमुखांच्या अडचणीत वाढ! माजी पीए पालांडे-शिंदेविरोधात आरोपपत्र दाखल होणार

Rohan_P

साताऱ्यातील तरूणाचा महामार्गावर आत्महत्येचा प्रयत्न

Abhijeet Shinde
error: Content is protected !!