तरुण भारत

सोलापूर जिल्ह्यातील ३६ हजार शेतकऱ्यांच्या बांधावर बियाणे

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर

खरीप हंगाम सुरू झाला आहे. कोरोनामुळे जिल्ह्यातील कृषी दुकानांमध्ये गर्दी होऊ नये यासाठी जिल्ह्यातील ३६ हजार ३२४ शेतकऱ्यांच्या बांधावर बी-बियाणे खते पुरवठा करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार सांगितली आहे.

Advertisements

जिल्ह्यातील सात हजार ९६५ शेतकरी गटामार्फत ८८ हजार ६७० क्विंटल खते २७८४ क्विंटल बियाणे वर वितरण करण्यात आले आहे. पेरण्या सुरू असून खरंच या मागणीनुसार खते बी-बियाणे शेतकऱ्यांच्या बांधावर वितरित करण्यात येणार आहेत.

पालकमंत्री दत्ता भरणे यांनी खरीप हंगाम सुरू होण्याच्या अगोदर पूर्व आढावा बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या बांधावर खते, बी-बियाणे उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हा कृषी विभागाला दिल्या होत्या. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खते बियाणे यांचे वितरण बांधावर करण्यात आले आहे. खरीप हंगामातील पेरणी सुरू असून जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना खते, बियाणे पुरवठा करण्यात येणार आहे. बांधावरील शेतकऱ्यांनी गट करून खते, बियाणे यांची मागणी करावी, असे अहवान जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बिराजदार यांनी केले आहे.

Related Stories

डीईएसच्या रक्तदान शिबिरात 228 रक्त पिशव्यांचे संकलन

pradnya p

बार्शीतील सुधारित प्रतिबंधित क्षेत्राचा निर्णय अमानवी आणि चुकीचा

triratna

सोलापूर : मर्चंट नेव्हीमधील अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला;आरोपी मोकाट

Shankar_P

शासकीय सेवेत समयोजनासाठी डॉक्टरांचा बेमुदत संप सुरु

Shankar_P

आयुक्त, उपायुक्तांना शिवीगाळीचा एमआयएमकडून निषेध

Shankar_P

भारत बंदला अकोला, धुळ्यात हिंसक वळण

prashant_c
error: Content is protected !!