तरुण भारत

शंकरसिंह वाघेला यांनी दिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा

ऑनलाईन टीम / अहमदाबाद : 


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय महासचिव शंकर सिंह वाघेला यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्या बरोबरच त्यांनी पार्टीच्या सक्रिय सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. वाघेला गुजरातमध्ये एनसीपीच्या अध्यक्ष पदावर जयंत पटेल उर्फ बोस्की यांची नियुक्ती झाल्यापासून पक्ष नेतृत्वावर नाराज दिसत होते. 

Advertisements


गुजरातच्या राजकारणातील मोठे नेता म्हणून प्रसिद्ध असलेले वाघोला काँग्रेसला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीमध्ये सहभागी झाले होते. सुरवातीला ते आरएसएसचे सदस्य म्हणून कार्यरत होते. त्यानंतर 1980 ते 1995-96 पर्यंत त्यांनी भाजपमध्ये खासदार, महासचिव, गुजरचे भाजप अध्यक्ष अशा विविध पदांवर कार्यरत होते.

मात्र, 1996 मधील लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांनी भाजप पक्ष सोडून स्वतःचा राष्ट्रीय जनता पक्ष स्थापन केला आणि ऑक्टोबर 1996 मध्ये काँग्रेसने दिलेल्या समर्थनामुळे गुजरातचे मुख्यमंत्री देखील झाले. 1997 पर्यंत मुख्यमंत्री असलेल्या वाघोला यांनी गेल्यावर्षी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. 

Related Stories

तामिळनाडू राज्यातही 31 ऑगस्टपर्यंत टाळेबंदी

Patil_p

कर्नाटक: मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या मुलांसाठी नवीन शिष्यवृत्ती योजनेची केली घोषणा

Abhijeet Shinde

महाराष्ट्रात किमान 30 एप्रिलपर्यंत लॉक डाऊन कायम : मुख्यमंत्री

prashant_c

बद्रीनाथ, केदारनाथ येथे दरदिनी 3 हजार भाविकांना अनुमती

Patil_p

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी महावितरणचे कर्मचारी संपावर ?

Rohan_P

राजकीय ग्रुप्सबाबत फेसबुक अधिक दक्ष

Patil_p
error: Content is protected !!