तरुण भारत

दिल्ली : आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्या प्रकृतीत सुधारणा; जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


कोरोनाची बाधा झालेले दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची प्रकृती सुधारली असून त्यांना आज जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले. तसेच त्यांना लावण्यात आलेली ऑक्सिजनची सपोर्ट सिस्टीम देखील हटवण्यात आली आहे. 

Advertisements


सत्येंद्र जैन यांना 17 जून रोजी कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. यादरम्यान त्यांचा फुफ्फुसांना संसर्ग झाला. त्यामुळे सत्येंद्र जैन यांची प्रकृती खालावली. यानंतर त्यांना साकेत येथील मॅक्स सुपर स्पेशालिटी स्मार्ट रुग्णालयात हलविण्यात आले. 


त्यादरम्यान, शनिवारी त्यांच्यावर प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचार करण्यात आले. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून त्यांना सोमवारी जनरल वॉर्डमध्ये आणले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. असे डॉक्टरांनी सांगितले. 

Related Stories

पुण्यात होणार ‘स्पुतनिक-व्ही’चे उत्पादन

datta jadhav

गुलबर्ग्यात कोरोनाचा आणखी एक बळी

Patil_p

ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या कोरोना लसीची मानवी चाचणी यशस्वी

datta jadhav

दिल्लीत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यू झाल्यास सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत

Rohan_P

39 औषधांचा आवश्यक यादीत समावेश

Patil_p

दिल्ली : 357 नवे कोरोना रुग्ण; 11 मृत्यू

Rohan_P
error: Content is protected !!