तरुण भारत

आज 25 जणांना सोडले घरी ; 171 जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह

प्रतिनिधी / सातारा

क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुगणालय, सातारा येथील 1, कोविड केअर फलटण येथील 2, कृष्णा मेडीकल कॉलेज, कराड येथील 8, बेल एअर हॉस्पिटल, पाचगणी येथील 6, कोविड केअर केंद्र खावली येथील 6, कोविड केअर केंद्र वाई येथील 1, कोविड केअर केंद्र ब्रम्हपुरी येथील 1 असे एकूण 25 रुगणांना आज 10 दिवसानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

Advertisements

आज घरी सोडणाऱ्यांमध्ये कृष्णा हॉस्पिटल, कराड येथील कराड तालुक्यातील वडगांव (उंब्रज) येथील 86 वर्षीय पुरुष, तुळसण येथील 51, 50 व 35 वर्षीय पुरुष, केसे येथील 64 वर्षीय पुरुष, पाटण तालुक्यातील उरुल येथील 26 वर्षीय पुरुष,जांभेकरवाडी येथील 30 वर्षीय पुरुष, नवसारी येथील 55 वर्षीय पुरुष. बेल एअर हॉस्पिटल, पाचगणी येथील जावली तालुक्यातील भणंग येथील 24 वर्षीय युवती व 21 वर्षीय युवक,ओझरे येथील 5 वर्षीची बालिका, 25 वर्षीय महिला व 34 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. धोंडेवाडी येथील 65 वर्षीय पुरुष.

कोविड केअर केंद्र, ब्रम्हपुरी* येथे दाखल असणाऱ्यांमध्ये कोरेगाव तालुक्यातील साप येथील 39 वर्षीय पुरुष्. कोविड केअर केंद्र, वाई येथे दाखल असणाऱ्यांमध्ये वाई तालुक्यातील बावधन नाका येथील 25 वर्षीय पुरुष. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुगणालय, सातारा* येथे दाखल असणाऱ्यांमध्ये जावली तालुक्यातील धोंडेवाडी येथील 57 वषीय पुरुष. कोविड केअर केंद्र, खावली येथे दाखल असणाऱ्यांमध्ये सातारा तालुक्यातीलसमर्थ नगर येथील 19 वर्षीय युवक, देगाव येथील 55 वर्षीय पुरुष,शहापुरी येथील 58 वर्षीय पुरुष, कारंडवाडी येथील 23 वर्षीय महिला 8 वर्षीय मुलगी, सैदापूर येथील 37 वर्षीय पुरुष. कोविड केअर केंद्र, फलटण* येथे दाखल असणाऱ्यांमध्ये फलटण तालुक्यातील वडले येथील 24 व 52 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.


171 जणांचा अहवाल आला निगेटिव्ह


काल रात्री उशिरा एन.सी.सी.एस. पुणे यांचेकडून 171 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले आहे.
248 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुगणालय, सातारा येथील 17, कृष्णा मेडीकल कॉलेज, कराड येथील 30, वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 77, ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथील 2, शिरवळ येथील 12, पानमळेवाडी येथील 16, मायणी येथील16, महाबळेश्वर येथील5, पाटण येथील24, दहिवडी येथील 49 असे एकूण 248 जणांच्या नागरिकांच्या घशातील स्त्रावाचे नमुने एन.सी.सी.एस, पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

Related Stories

पंतप्रधानांनी ‘त्या’ लढ्यातील सहभागाची माहिती विस्तृत द्यावी

triratna

कोल्हापूर : तीन हजाराची लाच स्विकारताना कॉन्स्टेबलसह होमगार्ड जेरबंद

triratna

सातारा : डोंगरकपारीत औषधी वनस्पतींची लागवड

datta jadhav

सातारा तालुक्यातील 210 रेशन दुकानदारांचे 10 कोट रुपये तीन महिने अडकले

Shankar_P

साताऱ्यातील मनोरमाची राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत यशस्वी कामगिरी

datta jadhav

मिरजेतील डॉक्टराला कोरोनाची लागण

triratna
error: Content is protected !!