तरुण भारत

नेपाळमध्ये कोरोनाचा कहर, ओलींचे दुर्लक्ष

सामूहिक प्रतिकारक्षमतेवरच भरवसा

वृत्तसंस्था/ काठमांडू

Advertisements

नेपाळमध्ये कोरोनाबाधितांचे प्रमाण वेगाने वाढू लागले आहे. परंतु तेथील के.पी. ओली शर्मा यांचे सरकार अद्याप कथितरित्या नेपाळींच्या मजबूत रोगप्रतिकारक्षमतेच्या भरवशावर आहे. पंतप्रधान ओली हे वारंवार नेपाळच्या रोगप्रतिकारक्षमतेचा दाखला देत आहेत. कोरोना विषाणूच्या संसर्गापासून वाचण्यासाठी लोकांनी हळदयुक्त दूध प्यावे असा सल्लाही त्यांनी लोकांना दिला आहे.

नेपाळ सरकारची आकडेवारी मात्र ओली यांच्या दाव्यांशी सुसंगत नाही. नेपाळमध्ये बळी पडलेल्या लोकांना जुने आजार होते असे दिसून आले आहे. तर जुने आजार असलेल्या बाधितांचा कोरोनामुळे मृत्यू होण्याची शक्यता अधिक असल्याचे जगभरात दिसून आले आहे. 

अजब सल्ला

पंतप्रधान ओली यांनी पोकळ विधाने करणे टाळावे, पंतप्रधानांनी सत्य आणि संशोधनाच्या आधारावर विधाने करावीत. ओली यांच्या टिप्पणीमुळे जागतिक महामारीच्या संकटाकडे दुर्लक्ष होऊ शकते. ओली यांच्या हळदयुक्त दूधाच्या सेवनामुळे कोरोनावर उपचार होत असल्याचा कुठलाच वैज्ञानिक पुरावा नसल्याचे अनेक आरोग्यतज्ञांनी सरकारला सुनावले आहे. जुन्या आजारांनी ग्रस्त कोरोनाबाधितांमधील मृत्यूदर 12 पट अधिक असल्याचे अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने म्हटले आहे.

पंतप्रधानांना भ्रम

नेपाळमध्ये वादग्रस्त नकाशाला मंजुरी देण्यासाठी आयोजित संसदीय अधिवेशनात पंतप्रधान ओली यांनी कोरोना विषाणूशी लढण्यासाठी नेपाळींकडे मजबूत रोगप्रतिकारक्षमता असल्याचा दावा केला होता. नेपाळमध्ये बहुसंख्य लोकसंख्या 60 वर्षांपेक्षा कमी वयाची असल्याने कोरोनाचा धोका कमी असल्याचे त्यांनी म्हटले होते. तर नेपाळमध्ये शासकीय आकडेवारीनुसारच 30 टक्क्यांपेक्षा अधिक लोकांना कुठला न कुठला जुना आजार आहे.

9 हजारांपेक्षा अधिक रुग्ण

नेपाळ सरकारच्या निष्काळजीपणामुळेच कोरोना विषाणूने या पर्वतीय देशात फैलाव केला आहे. सोमवारपर्यंत नेपाळमध्ये 9,026 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर 23 बाधितांना जीव गमवावा लागला आहे.

30 टक्के लोकसंख्या ‘आजारी’

नेपाळ आरोग्य संशोधन परिषदेच्या आकडेवारीनुसार 12 टक्के लोकसंख्येला क्रॉनिक ऑब्सट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसिज (सीओपीडी) आहे. तर 8.5 टक्के लोकांना मधूमेहाची व्याधी आहे. 6 टक्के नागरिकांना क्रॉनिक किडनीची समस्या तर 3 टक्के जणांना कोरोनरी आर्टरी डिसिज आहे. तर सरकारकडे कर्करोग आणि रक्तदाबाने ग्रस्त नागरिकांची कुठलीच आकडेवारी नाही.

Related Stories

पाकिस्तानलाही घालायचीय ‘टिकटॉक’वर बंदी

datta jadhav

‘या’ कारणामुळे गूगलने घनी सरकारची ई-मेल अकाउंट केली लॉक

datta jadhav

भारतीय ‘मिशन मंगळ’नंतर चीनचे  ‘रोवर मिशन टू मार्स’ लॉन्च

Rohan_P

मंगळावर पोहोचणारा युएई ठरला पाचवा देश

Amit Kulkarni

जपानमध्ये धावू लागली डीएमव्ही बस

Patil_p

अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी पहिली डिबेट 29 सप्टेंबरला

datta jadhav
error: Content is protected !!