तरुण भारत

बायोकॉनचा डीकेएसएचसोबत करार

सिंगापूर, थायलंडमध्ये औषधे वितरणावर देण्यात येणार भर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

जैव तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख कंपनी म्हणून ओळख असणाऱया बायोकॉनने सिंगापूर आणि थायलंड या ठिकाणी आपली सात जनरिक उत्पादने वितरीत करण्यासाठी डीकेएसएचसोबत करार केला आहे. डीकेएसएच ही बाजारात विस्तार करत आपली सेवा देणारी कंपनी असून त्यांच्या सेवेचा लाभ बायोकॉन उठवणार आहे. या कराराची माहिती बायोकॉन कंपनीने दिली आहे.

उत्पादनाचे वितरण करण्यासाठी प्रामुख्याने बाजारातील बायोकॉन फार्मा लिमिटेड आणि डीकेएसएच बिजनेस युनिट हेल्थकेअर एकत्र आले आहेत. या संदर्भात नोंदणी आणि वाणिज्यकरणासाठी विशेष परवाना प्राप्त करुन दिला आहे. या औषधांचे वितरण बायोकॉन ब्रँडच्या नावाने सिंगापूर आणि थायलंडमध्ये करणार आहे. सदरच्या व्यवहारामधून बायोकॉन फार्माच्या विपणन आणि विक्रीसाठी लॉजिस्टिक व्यवस्थाही केली जाणार आहे. तसेच कंपनीची व्यवसाय वाढ आणि चिकित्सा तसेच औषध साखळी मजबूत करण्यासही मदत होणार असल्याचा विश्वास दोन्ही कंपन्यांनी व्यक्त केला आहे.

औषध उपलब्धी हेच ध्येय

गंभीर आजारांवर उच्च प्रतिच्या जनरिक औषधांचा पुरवठा कमी किमतीत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे बायोकॉनचे सीईओ सिद्धार्थ मित्तल यांनी म्हटले आहे. जेणेकरून औषधाची उपलब्धता पुरेशा प्रमाणात राहील.

Related Stories

तिसऱया दिवशी सेन्सेक्समध्ये 422 अंकांची घसरण

Patil_p

फ्लिपकार्ट आयपीओ आणणार?

Patil_p

विमान प्रवासी क्षमतेची मुदत वाढवली

Patil_p

सेन्सेक्स-निफ्टीची कामगिरी मजबूत स्थितीमध्ये

Patil_p

तिमाहीमध्ये स्टेट बँकेच्या नफ्यात 7 टक्के घट

Amit Kulkarni

टाटा समूहाकडून 500 कोटींचा मदतनिधी

tarunbharat
error: Content is protected !!