तरुण भारत

बेलग्रेडच्या पाच फुटबॉलपटूंना कोरोनाची बाधा

वृत्तसंस्था/ लग्रेड

सार्बियातील रेड स्टार बेलग्रेड फुटबॉल क्लबच्या पाच फुटबॉलपटूंना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती या क्लबच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी दिली आहे. 12 दिवसांपूर्वी झालेल्या एका सामन्यात रेड स्टार बेलग्रेड क्लब सहभागी झाला होता.

Advertisements

कोरोना महामारीमुळे युरोपमधील सर्व फुटबॉल स्पर्धा स्थगित किंवा लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. जवळपास तीन महिन्यांच्या कालावधीनंतर सर्बियात 12 दिवसांपूर्वी फुटबॉल सामना आयोजित केला होता. सर्बियाच्या शासनाने लॉकडाऊन निर्णयानंतर नियमामध्ये शिथिलता घोषित केल्याने हा सामना घेण्यात आला होता. हा सामना रेड स्टार बेलग्रेड आणि पार्टीझेन बेलग्रेड यांच्यात खेळविला गेला. या सामन्याला सुमारे 16,000 शौकिन उपस्थित होते. सर्बियन लीग फुटबॉल स्पर्धेतील हा अंतिम सामना होता आणि रेड स्टार बेलग्रेडने या स्पर्धेचे जेतेपद मिळाल्यानंतर सदर क्लबच्या सुमारे 10,000 चाहत्यांनी विजयोत्सव साजरा केला. 29 मे पासून सर्बियन लीग फुटबॉल स्पर्धेला पुन्हा प्रारंभ करण्यात आला होता.

Related Stories

पंतप्रधानांनी साधला पॅराऍथलेट्सशी सुसंवाद

Amit Kulkarni

कारात्सेव्ह, सेरेना, ओसाका, जोकोविच उपांत्य फेरीत

Patil_p

भारतीय महिला क्रिकेट संघासमोर मोठे आव्हान

Amit Kulkarni

इंग्लंडचे इव्हान्स, कॅरेसी पर्थ स्कॉचर्सशी करारबद्ध

Patil_p

पहिल्या डावाअखेर भारत 130 धावांनी आघाडीवर

Patil_p

मुंबई अंतिम फेरीत, विक्रमासह शॉचे आणखी एक शतक

Amit Kulkarni
error: Content is protected !!