तरुण भारत

रेशनच्या दुकानाला लागलेल्या आगीत साडे चार लाखाचे नुकसान

प्रतिनिधी/ सातारा

येथील शेटय़े चौकातील श्रीकांत शेटय़े यांच्या रेशनदुकानाला रविवारी पहाटे साडे चारच्या सुमारास शॉर्ट सर्किंटने आगली लागली. आगीत धान्य साठय़ांसह साहित्य जळून साडे चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. वेळीच सातारा पालिकेचा अग्निशमन दलाचा बंब पोहचताच आग आटोक्यात आणली. परंतु तोपर्यंत आगीत नुकसान झाले होते.

Advertisements

श्रीकांत शेट्टय़े हे रहात असलेल्या पार्किंगमध्येच त्यांच्या ऑफिसमध्ये आहे. त्यांच्याकडे विविध कंपनीच्या एजन्सी आणि रेशनिंग दुकानही आहे. पार्किंगमध्येच हा सर्व माल आणि धान्याची पोती ते ठेवत होते.रविवारी पहाटे सर्वजण गाढ झोपेत असताना अचानक शॉर्ट सर्किटने पार्किंगमध्ये आग लागली. शेटय़े कुटुंबास जाग आल्याने याची माहिती अग्निशमन दल आणि पोलिसांना दिली. आग आटोक्यात आणण्यासाठी स्थानिक नागरिकांनी धाव घेतली. सकाळी साडे सहा वाजेपर्यंत आग आटोक्यात आणण्यात यश आले. रेशनचे धान्य जळाले. काही धान्य वाचवण्यात यश आले. तब्बल साडे चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे श्रीकांत शेटय़े यांनी सांगितले.

Related Stories

देशी बनावटीच्या पिस्टलसह 3 काडतुस जप्त

Patil_p

महाराष्ट्रात 2,585 नवीन कोरोनाबाधित; 40 मृत्यू

Rohan_P

केंद्राने जाहीर केलेली रक्कम आणि आताच्या पूर परिस्थितीचा दुरान्वये संबंध नाही – अजित पवार

Abhijeet Shinde

सातारा : खुनाचा गुन्हा अवघ्या 2 तासात उघड

datta jadhav

मी अजून राष्ट्रवादीकडे वळलो नाही म्हणणाऱ्या राणेंना अजित पवारांचे उत्तर; म्हणाले…

datta jadhav

वळीवडे गावातील पॉझिटिव्ह मयत रुग्ण महे गावात येऊन गेल्याने गाव तीन दिवस बंद

Abhijeet Shinde
error: Content is protected !!