तरुण भारत

चिखलीकरांच्या मदतीमुळे माणुसकी जिवंत राहिल्याचे अधोरेखित : जिल्हाधिकारी देसाई


प्रयाग चिखली / प्रातिनिधी

महापुराने सर्वस्व हिरावून घेतलं मात्र माणुसकी तशीच कायम राहीली याचे जिवंत उदाहरण म्हणजे प्रयाग चिखली करांनी “कोरोना” च्या पार्श्वभूमीवर शासनाला केलेली मदत असल्याचे प्रतिपादन कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलतराव देसाई यांनी केले.

कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर प्रयाग चिखली (ता. करवीर) येथील ग्रामस्थांच्या वतीने शासनाला सव्वा तीन लाखाची मदत करवीरचे आमदार पी.एन.पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी देसाई यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

गतवर्षीच्या महापुराने अख्खं चिखली गावंच उठवलं. शेती कुजली, जुना कर्जाचा डोंगर असतानाच स्थलांतरीत ठिकाणी नवीन निवाऱ्यासाठी आर्थिक जुळणी कशी करायची अशा विवंचनेत असतानाच कोरोनाच्या संकट काळात शासनाला मदत करण्याची मानसिकता या ग्रामस्थांनी दाखवली. येथील माजी सरपंच केवलसिंग रजपूत यांनी केलेल्या आवाहनानुसार परिस्थितीने आळपलेले ग्रामस्थांचे दातृत्वाचे हात पुढे आले आणि बघता बघता सव्वातीन लाखांचा निधी चिखली ग्रामस्थांतून गोळा झाला सध्याची गरज म्हणून कोल्हापुरातील कोरोना हॉस्पिटल साठी आवश्यक दोन लाखाची आय. सी. सी. यु. मॉनिटर आणि सव्वा लाखाची आर्थिक मदत असे सव्वा तीन लाखाची मदत आज प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आली.

संकट काळात निधी संकलनासाठी पुढाकार घेणारे केवलसिंग रजपूत यांच्यासह ग्रामस्थांचा आदर्श सर्वांना प्रेरणादायी असाच असल्याची प्रतिक्रिया यावेळी आमदार पी.एन.पाटील यांनी व्यक्त केली.

दरम्यान प्रयाग चिखली च्या पुनर्वसनाच्या दृष्टीने आमदार पी एन पाटील यांच्याशी चर्चा करत ग्रामस्थांच्या पुनर्वसनाला प्राधान्य क्रम देण्याचे अभिवचन जिल्हाधिकारी देसाई यांनी यावेळी दिले.

प्रॉपर्टी कार्ड 30 दिवसात
गेल्या तीस वर्षापासून चिखली पुनर्वसनाबाबतचा रखडलेला प्रॉपर्टी कार्ड चा प्रश्न तीस दिवसात निकालात काढण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी देसाई यांनी ग्रामस्थांना यावेळी दिले

यावेळी करवीर पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष संभाजीराव पाटील, शिवाजीराव कवठेकर, करवीर काँग्रेसचे सदस्य धनाजी चौगले, करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर, बटूसिंग रजपूत उत्तम चौगले आदी मान्यवर उपस्थित होते.

Advertisements

Related Stories

पाटणमध्ये रात्रीत सहा ठिकाणी चोऱया

Patil_p

डॉ. शुभांगी गायकवाड सलग 12 तास धावणार

Patil_p

मिरजेतील डॉक्टराला कोरोनाची लागण

Abhijeet Shinde

मेढा येथे कोविड सेंटर उभारणीसाठी चर्चा

Patil_p

पेट्रोल पुन्हा महागले; डिझेल दर मात्र स्थिर

Patil_p

नवरात्रोत्सवाला आजपासून प्ररंभ

Abhijeet Shinde
error: Content is protected !!