तरुण भारत

अमेरिकेत उद्यापासून एच-1बी व्हिसावर निर्बंध

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

कोरोनामुळे अमेरिकेत बेरोजगारीचे संकट उभे ठाकले आहे. बेरोजगारीची ही समस्या दूर करण्यासाठी एच-1बी व्हिसावर 2020 अखेरपर्यंत निर्बंध घालण्याची घोषणा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. उद्यापासून (दि.24) वर हे निर्बंध लागू होतील. ट्रम्प प्रशासनाने H-1B व्हिसासह अन्य श्रेणीतील व्हिसासाठीही निर्बंध लागू केले आहेत.

Advertisements

एच-1बी व्हिसाला स्थगिती दिल्यास देशाबाहेरील कोणालाही रोजगार मिळवण्यासाठी अमेरिकेत येता येणार नाही. त्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळेल, हा यामागचा उद्देश आहे. ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयाचा फटका अनेक भारतीय नागरिकांना आणि कंपन्यांनाही बसणार आहे. 

एच-1बी व्हिसाच्या आधारे ‘आयटी’ क्षेत्रात बहुसंख्य परदेशी युवकांनी अमेरिकेत रोजगार मिळवला आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकांचे एम्प्लॉयमेंट व्हिसा आणि एच-1बी व्हिसा स्थगित करण्याचा विचार मागील काही दिवसांपूर्वी केला होता. त्यावर पर्यायांची चाचपणी सुरू होती. अखेर ट्रम्प यांनी एच-1बी व्हिसावर 2020 अखेरपर्यंत निर्बंध आणले.

अमेरिकेतील आर्थिक वर्ष 1 ऑक्टोबरपासून सुरू होते. ज्या कंपन्यांना आर्थिक वर्ष 2021 साठी अमेरिकी सरकारकडून H-1B व्हिसा जारी करण्यात आले होते त्यांना या निर्णयाचा फटका बसणार आहे. जोपर्यंत एच-1बी व्हिसावरील निर्बंध उठवले जात नाही, तोपर्यंत विदेशी नागरिकांना रोजगारासाठी अमेरिकेत बंदी राहील.

Related Stories

दिल्ली : मागील चोवीस तासात 591 नवे कोरोना रुग्ण, एकूण संख्या 12 हजार 910 वर

tarunbharat

पेरुला बसला भुकंपाचा धक्का 41 जण जखमी

Patil_p

महाराष्ट्र शासनाची कर्नाटकला अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्याची विनंती

Abhijeet Shinde

जॉन्सन अँड जॉन्सनने चाचणी रोखली

Patil_p

यूपीत भाजपला झटका; आणखी एका मंत्र्याने दिला राजीनामा

datta jadhav

काबूल हादरले

Amit Kulkarni
error: Content is protected !!