तरुण भारत

नवी मुंबईच्या महापालिका आयुक्तांची बदली; अभिजित बांगर नवे आयुक्त

ऑनलाईन टीम / नवी मुंबई : 


नवी मुंबईचे महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता सनदी अधिकारी अभिजित बांगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बांगर लवकरच आपला पदभार स्वीकारणार आहेत. 

Advertisements


मिळालेल्या माहितीनुसार, अभिजीत बांगर 2008 च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. युवा आणि धडाडीचे सनदी अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. सध्या नागपूर विभागाचे अतिरीक्त आयुक्त आहेत. 14 महिने नागपूर महापालिकेचे आयुक्त म्हणून त्यांनी काम केले आहे.


दरम्यान, मिसाळ यांच्या बरोबरच आणखी दोन सनदी अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. यामध्ये डॉ. विजय राठोड यांची मीरा भाईंदर मनपा आयुक्तपदी तर डॉ. राज ध्यानिधी यांची उल्हासनगर मनपा आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Related Stories

मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; राज्यात रविवारपासून रात्रीची जमावबंदी

Shankar_P

‘नमो ॲप’वर पण बंदी घाला : पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

pradnya p

किंचित दिलासा! नागपूरमध्ये दिवसभरात 6,863 जणांना डिस्चार्ज

pradnya p

मुख्यमंत्र्यांच्या सरकारी निवासस्थानी तैनात महिला पोलीस अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह

prashant_c

मान्सूनने महाराष्ट्र व्यापला

datta jadhav

राज्याने गाठला कोरोना चाचण्यांचा एक लाखांवरील टप्पा

prashant_c
error: Content is protected !!