तरुण भारत

एस.टी. कर्मचा-यांचे वेतन उद्या जमा होणार

तरुण भारत संवाद प्रतिनिधी/सोलापूर

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचा-यांचे वेतन पुरेशी रक्कम महामंडळाकडे उपलब्ध नसल्याने देय असलेल्या तारखेस वेळेत वेतन झालेले नाही. महामंडळाच्या सवलतींच्या प्रतिपूर्तीपोटी थकबाकीची रक्कम शासनाकडून २९७ कोटी रूपये येणे होते त्यापैकी २७० कोटी रूपये शासनाने रा.प. महामंडळास दिले आहेत.

महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेने शिवशाही, ब्रिक्स यासह कोणत्याही खाजगी कंत्राटदारांची बिले अदा न करता २७० कोटी रूपयांमधून केवळ एसटी कर्मचा-यांचे वेतन करण्याची मागणी केली होती ती प्रशासनाने मान्य केल्याने तसेच कर्मचा-यांचे वेतन देण्यास प्राधान्य दिल्याने उद्या कर्मचा-यांचे पगार होतील.

Related Stories

शोपियां चकमकीत दहशतवाद्याचा खात्मा; शोधमोहीम सुरू

datta jadhav

नाशिकने उठवलेलं वादळ अजून शमलेलं नाही: संजय राऊत

Abhijeet Shinde

जम्मू : मास्क न घातल्यास 500 रु, तर सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केल्यास 3 हजार रुपये दंड

Rohan_P

‘जी-7’मध्ये मोदींचा ‘व्हर्च्युअल’ सहभाग

Amit Kulkarni

सोलापूर : बार्शी नगर परिषद आर्थिक अडचणीत, नागरिकांनी घरपट्टी भरावी – आ. राजेंद्र राऊत

Abhijeet Shinde

देशात गेल्या 24 तासात 1007 नवे रुग्ण, 23 मृत्यू

prashant_c
error: Content is protected !!