तरुण भारत

अमेरिकेत 10 लाख जण संसर्गमुक्त

कोरोना महामारीतून बरे होण्याचे प्रमाण 42 टक्क्यांवर : जगभरात 92,14,585 बाधित : लस प्रकल्पांना वेग

कोरोना विषाणूची जगात 92 लाख 14 हजार 585 जणांना बाधा झाली आहे. यातील 49 लाख 61 हजार 139 बाधितांनी संसर्गावर यशस्वी मात केली आहे. अमेरिकेत बाधितांचे प्रमाण 23.88 लाख झाले आहे. यातील 42 टक्के म्हणजेच 10 लाखांपेक्षा अधिक बाधितांनी महामारीतून मुक्तता मिळविली आहे. जगात सर्वाधिक रुग्ण अमेरिकेतच सापडले आहेत. आफ्रिका खंडात सर्वाधिक कोरोनाबाधित दक्षिण आफ्रिकेत सापडले आहेत. तेथे 1.01 लाख रुग्ण आढळून आले असून 1,991 जणांचा मृत्यू झाला आहे.

Advertisements

न्यूयॉर्क : निर्बंध शिथिल

न्यूयॉर्क शहर दोन टप्प्यात खुले केले जाणार आहे. शहरातील लोकांना आता घराबाहेर खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. तर रेस्टॉरंट आणि सलून 50 टक्के क्षमतेसह सुरू करण्यात आले आहेत. अमेरिकेत न्यूयॉर्क प्रांतामध्येच सर्वाधिक कोरोनाबाधित सापडले आहेत. शहरात आतापर्यंत 4.11 लाख रुग्ण सापडले असून 31 हजारांपेक्षा अधिक जणांचा बळी गेला आहे.

चीन : 22 नवे रुग्ण

चीनमध्ये कोरोना संसर्गाचे 22 नवे रुग्ण सापडले आहेत. नव्या रुग्णांपैकी 13 जणांना देशांतर्गत संसर्ग झाला आहे. तर 9 रुग्ण विदेशातून आलेले आहेत, अशी माहिती नॅशनल हेल्थ कमिशनने दिली आहे. आयोगानुसार सर्व देशांतर्गत संसर्गाची प्रकरणे बीजिंगमध्ये आढळून आली आहेत. दिवसभरात देशात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. बीजिंगमध्ये मात्र कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

तुर्कस्तान : मास्क अनिवार्य

तुर्कस्तानात सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान न केल्यास 900 लीरा (9,985 रुपये) पर्यंतचा दंड ठोठावला जाणार आहे. रुग्णसंख्येत वाढ झाल्याने हा नियम लागू करण्यात आला आहे. मागील 24 तासांमध्ये 1,212 रुग्ण आढळून आले असून 24 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती तुर्कस्तानचे आरोग्यमंत्री फरहान कोजा यांनी दिली आहे. तुर्कस्तानात आतापर्यंत 1,88,897 बाधित सापडले असून 4,974 जण दगावले आहेत.

इजिप्त : 56,809 रुग्ण

इजिप्तमध्ये 1,576 नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर रुग्णांचे एकूण प्रमाण वाढून 56,809 झाले आहे. देशात मागील 24 तासांत 85 जणांना जीव गमवावा लागला आहे. देशातील बळींचा आकडा आता 2,278 झाला आहे. तर दिवसभरात 397 जणांना संसर्गापासून मुक्तता मिळाली आहे.

‘डॉग मीट फेस्टिव्हल’

वुहानमधून फैलावलेल्या कोरोना विषाणूनंतर आता चीनच्या एका शहरात वार्षिक डॉग मीट फेस्टिव्हलचे आयोजन सुरू झाले आहे. 10 दिवसांपर्यंत हा महोत्सव चालणार आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमात सामील लोकांची संख्या कमी करण्यात आली आहे. तसेच यंदा अंतिमवेळा हा कार्यक्रम आयोजित केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

आरोग्य कारणास्तव वन्यजीव आणि पाळीव प्राण्यांच्या मासांच्या व्यापाराला रोखण्याच्या सरकारच्या मोहिमेनंतरही चीनमध्ये डॉग मीट फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे.

ब्राझील : 11 लाखापार

ब्राझीलमध्ये कोरोना बाधितांचे प्रमाण आता 11,11,348 झाले आहे. देशात मागील 24 तासांदरम्यान 21,432 नवे रुग्ण सापडले आहेत. तर आतापर्यंत 5 लाख 71 हजार 649 बाधितांनी महामारीवर मात केली आहे. आरोग्य मंत्रालयानुसार दिवसभरात 654 जणांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलमधील बळींचा आकडा 51,407 वर पोहोचला आहे. देशातील कोरोना महामारीचा मृत्यूदर 4.6 टक्के इतका आहे.

सिंगापूरमध्ये निवडणूक

सिंगापूरमध्ये 10 जुलै रोजी सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. कोविड-19 च्या प्रकोपावरून शहर-राज्यातील नियंत्रणातील स्थिती पाहता निवडणुकीचा निर्णय घेण्यात आला आहे. सिंगापूरने मागील आठवडय़ात कोरोना संकटादरम्यान लागू टाळेबंदीचे बहुतांश निर्बंध शिथिल केले आहेत. सिंगापूरमध्ये दिवसभरात 119 नवे रुग्ण सापडले आहेत.

पाकिस्तान : 105 बळी

पाकिस्तानात मागील 24 तासांमध्ये कोरोना विषाणूमुळे 105 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील बळींचा आकडा 3,695 वर पोहोचला आहे. तर बाधितांचे एकूण प्रमाण आता 1,85,034 झाले आहे. देशात आतापर्यंत 11,26,761 जणांची चाचणी करण्यात आली आहे. पाकिस्तानात कोरोना संसर्गामुळे 92 डॉक्टरांना जीव गमवावा लागला आहे.

Related Stories

खरंच -वाहिन्यांशिवाय होणार वीजपुरवठा

Patil_p

2022 पर्यंत राहणार सोशल डिस्टेंसिंग

Patil_p

ईयूमधील सात देश आणि स्वित्झर्लंडमध्ये कोविशिल्ड लसीला मंजूरी

Abhijeet Shinde

लक्षणरहित संसर्ग रोखण्यासही प्रभावी : लॅन्सेट नियतकालिकात अहवाल प्रकाशित

Omkar B

टोकियोमध्ये आणीबाणी लागू; प्रेक्षकांच्या अनुपस्थित होणार ऑलिम्पिक स्पर्धा

Abhijeet Shinde

‘या’ देशात 2 वर्षांवरील मुलांनाही दिली जातेय कोरोना लस

datta jadhav
error: Content is protected !!