तरुण भारत

विदेशींना यंदा हज यात्रा मुकणार!

सौदी अरेबियाची घोषणा : भारतीय यात्रेकरूंना रक्कम परत मिळणार

वृत्तसंस्था/ रियाध

Advertisements

कोरोना महामारीदरम्यान सौदी अरेबियात यंदा हज यात्रा होणार असली तरीही नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. यंदा केवळ सौदी अरेबियात राहणाऱया लोकांनाच यात्रा करता येणार आहे. विदेशी नागरिकांना हज यात्रेची अनुमती दिली जाणार नाही. तसेच चालू वर्षात मर्यादित संख्येतच लोकांना हज करण्याची अनुमती मिळणार आहे. सौदी सरकारच्या या निर्णयानंतर भारत 2.3 लाख यात्रेकरूंची पूर्ण रक्कम त्यांच्या खात्यात हस्तांतरित करणार आहे. यंदा 28 जुलै ते 2 ऑगस्टपर्यंत हज यात्रा होणार होती.

भारत यंदा हज यात्रेकरूंना सौदी अरेबियात पाठविणार नाही. चालू वर्षात 2.3 लाख जण सौदी अरेबियात जाणार होते, या सर्वांची रक्कम खात्यात हस्तांतरित केली जाणार असल्याची माहिती केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी मंगळवारी दिली आहे. भारतीय यात्रेकरूंना दोन हप्त्यांमध्ये 2 लाख रुपये भरावे लागतात. 2018 मध्ये हज यात्रेसाठीचे अनुदान संपुष्टात आणले गेले होते. त्यापूर्वी सरकार प्रत्येक हज यात्रेकरूला सुमारे 37 हजार रुपयांचे अनुदान देत होते. यंदा जगभरातून 20 लाख लोक हज यात्रेसाठी मक्का-मदीना येथे पोहोचण्याची शक्यता होती. 1932 नंतर पहिल्यांदाच हज यात्रेवर अशाप्रकारचे बंधन आणले गेले आहे.

Related Stories

पुढील आठवडय़ात मोठा निर्णय घेऊ

Patil_p

स्पेनमध्ये 24 मेपर्यंत आणीबाणी

Patil_p

चीनपाठोपाठ आता नेपाळचा नकाशात खोडसाळपणा

Patil_p

ब्राझीलमध्ये 2.25 लाख कोरोनाबळी

datta jadhav

युरोपात नोव्हेंबरमध्येच आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण

datta jadhav

कोरोनाचा टी-पेशींवर पडतो प्रभाव

Patil_p
error: Content is protected !!