तरुण भारत

सलग 17 व्या दिवशी इंधन दरवाढ

नवी दिल्ली

सरकारी तेल विपणन कंपन्यांनी मंगळवारी सलग 17 व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढविल्या आहेत. या दरवृद्धीमुळे राजधानी नवी दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलची किंमत आता एकसमान होण्याच्या स्थितीनजीक पोहोचली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशननुसार दिल्लीत पेट्रोलची मंगळवारी किंमत 20 पैशांनी वाढून 79.76 रुपये प्रतिलिटर झाली आहे. 28 ऑक्टोबर 2018 नंतरची हा उच्चांकी दर आहे. तर डिझेलच्या दरात 55 पैशांच्या वृद्धीसह विक्रम 79.40 रुपये प्रतिलिटरवर किंमत पोहोचली आहे. पेट्रोलच्या तुलनेत डिझेलचे दर वेगाने वाढल्याने दोघांच्या मूल्यामधील अंतर केवळ 36 पैसे राहिले आहे. या 17 दिवसांमध्ये दिल्लीत पेट्रोल 8.50 रुपये म्हणजेच 11.93 टक्के आणि डिझेल 10.01 रुपये म्हणजेच 14.43 टक्के महागले आहे.

Advertisements

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर अद्याप वाढलेले नाहीत. तरीही देशांतर्गत बाजारपेठेत पेट्रोल-डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्यांना महागाईची झळ पोहोचू लागली आहे. इंडियन बास्केटमध्ये कच्च्या तेलाची किंमत 40 डॉलर्स प्रति बॅरलच्या आसपास राहिली आहे. तरीही पेट्रोल-डिझेलच्या दरात सर्वसामान्यांना दिलासा मिळत नसल्याचे चित्र आहे.

Related Stories

जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या 7 जागा वाढणार

datta jadhav

तिबेटच्या नव्या ‘सिक्योंग’ने घेतली शपथ

Amit Kulkarni

सिक्कीम सीमेवरही नरमला चीन

Patil_p

149 नागरिक लंडनहून जयपूर शहरात दाखल

Patil_p

राजस्थानमध्ये एका दिवसात 91 नवे कोरोना रुग्ण, तर दोन जणांचा मृत्यू

Rohan_P

”माझी सर्वांना विनंती आहे की, आमचा त्रास वाढवू नका ” – हॉकीपटू वंदना कटारिया

triratna
error: Content is protected !!