तरुण भारत

ग्रामीण भागातील ओपीडी सुरू ठेवाव्यात

प्रतिनिधी/ कराड

शहरात होणारी गर्दी टाळण्यासाठी शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवाव्यात. ग्रामीण भागात प्रॅक्टीस करणाऱया डॉक्टरांनी ओपीडीत उपस्थित राहावे,  असा निर्णय कराड नगरपालिका प्रभाग समितीच्या बैठकीत निर्णय झाला असून याबाबत तहसीलदार अमरदीप वाकडे आदेश काढणार आहेत.

Advertisements

सोमवारी सायंकाळी यशवंतराव चव्हाण स्मृतीसदनमध्ये कराड नगरपालिका शहर स्तरीय सुकाणू समिती व प्रभाग समितीची बैठक पार पडली. तहसीलदार अमरदीप वाकडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, मुख्याधिकारी यशवंत डांगे यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीस शहरातील वैद्यकीय व्यावसायिक, डॉक्टर्स, आशा स्वयंसेविका, शहर नागरी आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी व डॉक्टर्स उपस्थित होते.

प्रमाणपत्रे खासगी डॉक्टार देवू शकतात

परराज्यातील मजूर तसेच प्रवासाचे वैद्यकीय प्रमाणपत्र घेण्यासाठी कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयांमध्ये मोठय़ा प्रमाणात गर्दी होत आहे. ही प्रमाणपत्रे सरकारी दवाखान्यात शिवाय खासगी डॉक्टरही देऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी तसेच मजुरांनी उपजिल्हा रुग्णालयात गर्दी करू नये. खासगी रुग्णालय, डॉक्टराकडून ही प्रशस्तीपत्रे घ्यावीत, असे आवाहन या बैठकीत करण्यात आले. शहरात बाहेरून आलेल्यांची संख्या 1325

मुख्याधिकारी यशवंत डांगे म्हणाले, शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसूत्रीच्या आधारे नगरपरिषद काम करत आहे. अनलॉक सुरू झाल्यानंतर शहरातील पुणे-मुंबईवरून सुमारे 1325 नागरिक आले आहेत. ज्यांची घरी सोय नाही, 25 नागरिकांना नगरपरिषदेच्या शाळेमध्ये ठेवले आहे. येत्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता तज्ञ व्यक्त करत आहेत. त्यामुळे शहरामध्ये उपाययोजना कायम राखणे गरजेचे आहे. खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी त्यादृष्टीने तयारी करावी. याबरोबरच ज्यांच्याकडे रुग्णवाहिका आहेत, त्या सज्ज ठेवाव्यात. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील म्हणाले, पावसाळा सुरू झाला असून साथीचे आधार आणि कोविडची लक्षणे यात साम्य असल्याने खबरदारी घेणे गरजेचे आहे.  वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर कुऱहाडे म्हणाले, कोरोना आणि साथीच्या आजारांबाबत जनजागृती करण्यासाठी परिपत्रके नागरिकांना वाटण्यात येतील. शहरातील गर्दी कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. प्रशस्तिपत्रे नेण्यासाठी लोक गर्दी करत असून त्याबाबत लोकांना जागृती करण्याची आवश्यकता आहे. नियोजन सभापती वाटेगावकर, विरोधी गटनेते सौरभ पाटील, ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर यांच्यासह नगरसेवक, डॉ. गुरसाळे, दादा शिंगण, डॉ. वैभव चव्हाण यांनी विविध सूचना केल्या. नगराध्यक्ष रोहिणी शिंदे यांनीही कराड नगरपरिषदेच्या मीच माझा रक्षक या अभियानात सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Related Stories

अमरावतीत होणार जगातील सर्वात मोठा स्कायवॉक

datta jadhav

अखिल भारतीय किसान सभा संघटनेचा भारत बंदला पाठिंबा

Patil_p

वैद्यकीयची प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया स्थगित करा

Abhijeet Shinde

साताऱ्यातील रुग्णवाढीचा वेग कायम

datta jadhav

राम मंदिर : आरोप करणाऱ्यांनी पावती दाखवा अन् देणगी परत घेऊन जा – साक्षी महाराज

Abhijeet Shinde

कास रोडचे रुंदीकरण कधी पूर्ण होणार?

datta jadhav
error: Content is protected !!