तरुण भारत

महिला बचतगटांनी तयार केले मानिनी मास्क

प्रतिनिधी/ कराड

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. या कार्यात गावस्तरावरील महिला बचतगटातील महिलांनी देखील सक्रीय सहभाग घेतला आहे. जिह्यातील 132 महिला बचतगटातील 384 महिलांनी या मोहिमेत आज अखेर 2 लाख 14 हजार मास्क तयार केले आहेत. हे मास्क मानिनी मास्क या ब्रॅण्ड नावाने तयार करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी दिली. दरम्यान, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पंचायत राज सशक्तीकरण पुरस्कार नुकताच जाहीर झाल्याची माहितीही त्यांनी दिली.

Advertisements

आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, अविनाश फडतरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. ते म्हणाले, मानिनी मास्कच्या माध्यमातून 21 लाख रुपयांचा व्यवसाय स्वयंसहाय्यता समुहांना उपलब्ध झाला आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजना समुदाय आधारित कार्यक्रम तसेच प्रशिक्षण व क्षमता बांधणी कार्यक्रमामध्ये प्रथम क्रमांकाचा पुरस्कार, मुदतीत तसेच कार्यक्रमाचे योग्य नियोजन केल्यामुळे पुरस्कार मिळाला आहे. 2019-20 समुदाय आधारित कार्यक्रम जिह्यातील 4 हजार 810 अंगणवाडय़ांमध्ये 1 लाख 17 हजार 360 कार्यक्रम घेण्यात आले. तसेच पोषण अभियान 2019-20 मध्ये सातारा जिह्याने उल्लेखनिय कामगिरी केली आहे. त्याबद्दल उत्कृष्ट जिल्हा म्हणून निवड करण्यात आली आहे.

पंचायत सशक्तीकरण पुरस्कार

2020 राज्यात प्रथम

राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यांच्या हस्ते प्रोत्साहन पुरस्काराने दि. 6 मार्च 2020 राजी गौरव करण्यात आला. तसेच पंचाय त सशक्तीकरण पुरस्कार, पंडित दिनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार 2020 राज्यात प्रथम मिळाला आहे. तसेच माण तालुक्यातील इंजबाव व खटाव तालुक्यातील खटाव या गावांचाही होणार आहे, असे त्यांनी सांगितले. 

Related Stories

आठ वर्षानंतर जिल्हा रूग्णालयाच्या आवारात डांबरीकरण

Patil_p

म्हाडा रहिवाशांना सरकारचा मोठा दिलासा

triratna

खरीप हंगामासाठी खते व बि-बियांणाची पुरेशी उपलब्धता : कृषिमंत्री भुसे

triratna

पेट्रोल पंपावर पोलिस तैनात

Patil_p

सातारा : व्यापाऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही – गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी

triratna

सातारा : कुसुम्बी ग्रामपंचायतीने लग्न समारंभावर केली कारवाई

triratna
error: Content is protected !!