तरुण भारत

जिल्हय़ात आणखी दोघे कोरोनाबाधित

महाराष्ट्रातून आलेल्या दोघांना लागण

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisements

जिल्हय़ात आणखीन दोघांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आला आहे. त्यामुळे बेळगाव जिल्हय़ाचा आकडा 311 वर पोहोचला आहे. तर मंगळवारी राज्यात 322 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे पुन्हा कोरोनाची धास्ती वाढली आहे.

दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा गुरुवारी होणार आहे. असे असताना राज्यात कोरोनाबाधितांच्या आकडय़ामध्ये झपाटय़ाने वाढ होताना दिसत आहे. बेळगाव जिल्हय़ातील 21 वषीय युवतीला आणि सहा वषीय मुलाला कोरोनाची बाधा झाली आहे. हे दोघेही महाराष्ट्रातून येथे आले होते. त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पुन्हा जिल्हय़ाच्या आकडय़ामध्ये वाढ झाली आहे.

बेळगाव जिल्हय़ामध्ये आतापर्यंत 311 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामधील 282 जण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या 28 जणांवर उपचार सुरू आहेत. तर एका महिलेचा मृत्यू झाला आहे. बेळगाव जिल्हय़ामध्ये कोरोनामुक्त होणाऱया रुग्णांची आकडेवारी दिलासादायक आहे. असे असले तरी मंगळवारी पुन्हा दोन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे भितीचे वातावरण पसरले आहे.

Related Stories

किल्ला तलावात सोडणार 25 हजार मत्स्यबीज

Amit Kulkarni

‘80 नंतरची मराठी ग्रामीण कादंबरी’ वर महत्त्वपूर्ण माहिती

Patil_p

वैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्प स्थलांतराचा मुद्दा ऐरणीवर

Patil_p

एसएसएलसी परीक्षार्थींना सूचना

Patil_p

‘सारी’ बळींना बिम्सकडून झुकते माप?

Rohan_P

केंद्राला नाराजीची जाणीव करून देण्याची हीच संधी

Amit Kulkarni
error: Content is protected !!