तरुण भारत

मंगळवारी नवे 45 कोरोना बाधित

चिंबल, मोर्ले, नवेवाडे भागात रुग्ण अधिक : राज्यात आतापर्यंत 205 रुग्ण झाले बरे

प्रतिनिधी / पणजी

Advertisements

गोव्यात मंगळवारी 45 नवीन कोरोना बाधित सापडले तर 53 रुग्ण बरे झाले. सक्रीय पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 702 वर स्थिरावली आहे. आतापर्यंत एकूण कोरोना रुग्ण 909 झाले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 205 वर पोहोचली आहे. कोरोना बळींची संख्या मात्र 2 आहे.

आरोग्य खात्याने सदर आकडेवारी प्रकाशित केली आहे. मंगळवारी संशयित कोरोनाचे रुग्ण म्हणून 22 जणांना आयसोलेशन वॉर्डामध्ये भरती करण्यात आले आहे. त्यांचे तपासणी अहवाल यायचे आहेत. विविध रेसिडेन्सी, हॉटेल्समध्ये क्वारंटाईन करून ठेवलेल्यांची संख्या 1323 आहे. मंगळवारी दिवसभरात 1991 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यातील 1274 जणांचे अहवाल निगेटिव्ह मिळाले तर 45 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. उर्वरित 672 जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.

विदेशी 11 तर 229 देशी प्रवासी क्वारंटाईन

दिवसभरात 11 विदेशी तर 229 देशी प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्यात आले. 179 जण पॅसिलिटी क्लारंटाईनमध्ये आहेत. सक्रीय असलेल्या 702 रुग्णांची विभागणी पुढीलप्रमाणे ः रस्ता, रेल्वे व विमानाने आलेले – 83, मांगोरहील – 327, मांगोरहील संबंधित – 205, कुडतरी 28, मडगाव – 16, आंबेलीशी संबंधित – 15, बेती – 1, केपे – 5, राय – 11, चिंबल – 4, नावेली – 3 आयसोलेटेड प्रकरणे – पर्वरी, सांखळी, म्हापसा (गंगानगर), वाडे प्रत्येकी एक.

मोठय़ा संख्येने असलेली कोरोनाग्रस्त ठिकाणे ः सडा – 50, बायणा – 37, चिंबल – 25,  मोर्ले – 19, न्यु वाडे – 17. कोरोनाचे रुग्ण वाढत असून दोन बळी गेल्यामुळे लोकांमध्ये अस्वस्थता दिसून येत आहे. सरकारने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कडक पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.

गोव्यात 23 जून 2020 पर्यंत कोरोनाबाधित 909

आतापर्यंत बरे झालेले रुग्ण                         205

उपचार घेणारे रुग्ण                                  702

Related Stories

पुस्तकांच्या विश्वात काम करणारा ग्रंथपाल

Omkar B

थिवी, वास्कोत पावणेदोन कोटीचा माल जप्त

Patil_p

गोव्यात कोरोनाबाधित नवीन रुग्णाची भर

Patil_p

मडगाव स्कूल कॉम्प्लेक्सला शासनाचा उत्कृष्ट पतसंस्थेचा पुरस्कार

Amit Kulkarni

कुंभारजुवे सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मूर्तीचे आज विसर्जन

Patil_p

सांकवाळ येथे गांजा लागवड प्रकरणी वृध्दास अटक

Omkar B
error: Content is protected !!