तरुण भारत

शिक्षकांनी आजपासून शाळेत हजेरी लावावी

प्रतिनिधी / पणजी

राज्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱयांनी आज बुधवार 24 जूनपासून नियमित शाळेत हजर राहून सेवा बजावावी असा आदेश गोवा शिक्षण संचालनालयाने दिला आहे. त्यासंबंधीचे परिपत्रक मंगळवारी जारी करण्यात आले आहे.

Advertisements

सर्व शाळा व्यवस्थापनांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासावर भर द्यावा. तसेच विविध कारणांमुळे ऑनलाईन वर्गात सहभागी होऊ शकत नाहीत, अशा विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात. त्यांच्यासाठी वेगळ्या उपाययोजना करुन अभ्यासक्रम पूर्ण करावा, असे आदेशात म्हटले आहे.

विद्यार्थ्यांशी शाळेचा संपर्क रहावा यासाठी ऑनलाईन वर्ग सुरु करण्यात आले होते. आता शाळा सुरु झाल्यास शिक्षकांनी 2020-21 शैक्षणिक वर्षाचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांकडून पूर्ण करुन घ्यावा, असे सूचविण्यात आले आहे.

दरम्यान, कंटेनमेंट झोनमध्ये असलेल्या शाळा तसेच या झोनमध्ये राहणारे शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱयांना हे परिपत्रक लागू होणार नाही. अशा शिक्षकांनी घरातूनच काम करावे, असेही पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

Related Stories

मुख्यमंत्र्यांना धमकी देणारा युवक गजाआड

Patil_p

फर्मागुडी येथे 19 रोजी शिवजयंती उत्सव

Omkar B

घरात एकच उमेदवारी, घराणेशाहीला थारा नाहीच!

Patil_p

कोरोना रुग्णसंख्या दोन हजार पार

Omkar B

कोटय़वधींची संसाधने घेऊनही मडगावची कचरा समस्या जैसे थे

Patil_p

मास्तीमळ प्रभागात पाणीटंचाई

Patil_p
error: Content is protected !!