तरुण भारत

हरियाणामध्ये कोरोना बाधितांची संख्या 11,520

ऑनलाईन टीम / हरियाणा : 


हरियाणामध्ये मागील चोवीस तासात कोरोनामुळे 9 रुग्णांचा मृत्यू झाला. तर 17 जिल्ह्यात 495 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोना बाधितांची संख्या 11 हजार 520 वर पोहोचली आहे. यामध्ये 7834 पुरुष,  3685 महिला आणि एका तृतीपंथीचा समावेश आहे. तर आतापर्यंत 178 जणांनी आपला जीव गमावला आहे. यामध्ये 123 पुरुष आणि 55 महिला आहेत. 

Advertisements


यातच दिलासादायक बाब म्हणजे रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. सध्या रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 56.4 टक्के असून कोरोना संसर्गाचे प्रमाण 5.18 टक्के इतके आहे. तर आतापर्यंत 600 पेक्षा अधिक रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी आढळलेल्या 495 रुग्णांपैकी गुरुग्राममध्ये सर्वाधिक 133, फरिदाबाद मध्ये 183, सोनपतमध्ये 59, रोहतक 1, अंबाला 9, भिवानी 53, करनाल 8, हिसार 3, झज्जर 9,  नूह 19, पानिपत 3, कुरुक्षेत्र मधील 4, फतेहाबाद 1, पंचकुला 1, जींद 2, सिरसामधील 4 आणि यमुनानगर मधील 3 रुग्णांचा समावेश आहे. 

Related Stories

”बंगालमध्ये पुन्हा दीदीच येतील”

triratna

राफेलचा हवाई दलात समावेश

pradnya p

बचत योजनांवरील व्याजदर ‘जैसे थे’

Patil_p

पीएफआयला मॉरिशसमधून 50 कोटींचा निधी

Omkar B

एस.एन. ब्रह्मण्यन यांची राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती

Shankar_P

महाराष्ट्रात मागील 24 तासात 985 कोरोनाचे बळी

pradnya p
error: Content is protected !!