तरुण भारत

महागाईचा भडका : पहिल्यांदाच पेट्रोलपेक्षा डिझेल महाग

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


देशात सलग 18 व्या दिवशी डिझेलच्या किंमती वाढ झाली आहे.  परंतु पेट्रोलच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत आज पहिल्यांदा असे झाले आहे की, डिझेलची किंमत पेट्रोल पेक्षाही वाढली आहे. मागील 18 दिवसात डिझेलच्या किंमतीत प्रति लिटर 10.48 रुपयांनी तर पेट्रोल 8.50 रुपयांनी वाढ झाली आहे. 

Advertisements


बुधवारी दिल्लीत एक लिटर डिझेलची किंमत 0.48 पैसे वाढली. त्यामुळे डिझेलची नवीन किंमत 79.88 तर पेट्रोलची किंमत 79.76 इतकी आहे. तर मुंबईत पेट्रोलचा भाव 86.54 रुपयांवर स्थिर आहे. तर डिझेल 78.22 रुपये झाला आहे. मंगळवारच्या तुलनेत आज 46 पैशांची वाढ झाली. मंगळवारी मुंबईत डिझेल 77.76 रुपये होते.


तर कोलकाता आणि चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 81.45 आणि 83.4 रुपये आहे. तर डिझेलची किंमत अनुक्रमे 70.6 आणि 77.17 इतकी झाली आहे. 

Related Stories

मुलांना शिकविण्यासाठी आम्रवृक्षावरच स्टुडिओ

Amit Kulkarni

जगभरात 17 लाख कोरोना रुग्ण, बळींची संख्या एक लाखावर

prashant_c

उत्सव, टाळ्या-थाळ्या खूप झाल्या; आता लोकांना व्हॅक्सीन द्या : राहुल गांधींचे ट्विट

Rohan_P

आरोग्य, कृषी क्षेत्रांमधील सहकार्य वाढविणार

Patil_p

गुलबर्ग्यात कोरोनाचा आणखी एक बळी

Patil_p

भवानीपूरमध्ये भाजप नेत्यावर हल्ला

Patil_p
error: Content is protected !!