तरुण भारत

वडाप चालकांचे मंत्री शंभूराज देसाई यांना निवेदन

सातारा/प्रतिनिधीवाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री ना. शंभुराजे देसाई यांची नागठाणे येथे शिवसेना कराड उत्तर मधील पदाधिकारी आणि कर्यकर्त्यांनी भेट घेऊन आगमी नियोजन संदर्भात चर्चा केली.

या दौऱ्यांचे औचित्य साधून नागठाणे, सातारा – नागठाणे, उंब्रज काळी पिवळी वडाप संघटनेच्या वतीने व सातारा , सांगली, जिल्ह्याच्या वतीने मंत्री देसाई यांना निवेदन देण्यात आले. गेले चार महिने बंद असलेल्या वडाप वाहतूकीमुळे त्यावर अवलंबून असलेल्या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. तरी शासनाच्या वतीने काही तरी सुविधा उपलब्ध व्हावी व लवकरात लवकर वडाप वाहतूक सुरु करण्यासाठी प्रयत्न करावेत यासाठी वाहतूक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री देसाई यांना निवेदन दिले. हे निवेदन देताना कराड उत्तर तालुका उपप्रमुख शंकर जगन्नाथ साळुंखे, वर्धन अॅग्रोचे संचालक अविनाश साळुंखे, नागठाणे ग्रा.प सदस्य संतोष साळुंखे पाटील, माजगाव गावचे सुपुत्र बबलू शेठ, बाळू मिस्त्री, तारळेगावचे सामाजिक कार्यकर्ते आभिजीत पाटील ( काका) आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Stories

सातारा जिल्ह्यात कोरोनाने तिघांचा मृत्यू, 203 नवे रुग्ण

Abhijeet Shinde

रिक्षावाल्या काकांना गुरुकुलच्या चिमुकल्यांकडून मदतीचा हात

datta jadhav

मिनी रिफायनरीसाठी सिंधुदुर्गचाही पर्याय

Patil_p

चंदगड तालुक्यात दुसरे पोलीस स्टेशन उभारण्यासंदर्भात शासन सकारात्मक

Abhijeet Shinde

शिवेंद्रराजेंसह 18 जणांची निर्दोष मुक्तता

Patil_p

चिंकहिल येथील पोलिस कर्मचाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह

Abhijeet Shinde
error: Content is protected !!