तरुण भारत

मोदी सरकारने कोरोना महामारी, पेट्रोल डिझेलचे दर अनलॉक केले : राहुल गांधी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि पेट्रोल डिझेलच्या वाढत असलेल्या किंमती यावरुन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. 

Advertisements

राहुल गांधी यांनी आज ट्विट करत म्हणाले की, मोदी सरकारने कोरोना महामारी, पेट्रोल आणि डिझेलचे दर अनलॉक केले आहेत. पुढे ते म्हणाले, केंद्र सरकारने अनलॉक जाहीर केल्यापासून कोरोनाच्या रुग्ण संख्येबरोबरच इंधनाचेही दर वाढत असल्याचं गेल्या काही दिवसांपासून दिसत आहेत. तसेच कोरोनामुळे देशातील आरोग्यावर व्यवस्थेवर प्रचंड ताण आला आहे. 


खरं तर सरकारने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉक डाऊन लागू केला होता. लॉक डाऊन असेपर्यंत रुग्णवाढीचा वेग नियंत्रणात होता. मात्र, केंद्र सरकारनं अनलॉक जाहीर केल्यानंतर रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच आता पेट्रोल डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत, असेही त्यांनी यावेळी म्हटले. 


आपल्या ट्विट मध्ये राहुल गांधी एक आलेख देखील शेअर करत मोदी सरकारने कोरोना महामारी व पेट्रोल-डिझेलच्या किंमती अनलॉक केल्या आहेत, अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे. 

Related Stories

बेंगळूरमध्ये कोरोनाबाधितावर प्रथमच प्लाझ्मा थेरपी

Patil_p

दिल्ली – नोएडा बॉर्डरवर कोरोनाची रॅंडम रॅपिड तपासणी सुरू

Rohan_P

शहीदांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही; चीनला चोख प्रत्युत्तर देण्यास भारत सक्षम

datta jadhav

भारतीय खलाशांच्या सुटकेसाठी आंतरराष्ट्रीय साहाय्याचे आवाहन

Patil_p

संसदेवरील हल्ल्याला 20 वर्षे पूर्ण

Patil_p

केंद्रीय कृषिमंत्री तोमर यांचे ‘त्या’ वक्तव्यापासून घूमजाव

Patil_p
error: Content is protected !!