तरुण भारत

कोल्हापूर : मलकापूर नगरपरिषदेच्या स्वीकृत नगरसेवकपदी कोळेकर यांची बिनविरोध निवड

प्रतिनिधी/शाहुवाडी

मलकापूर (ता. शाहूवाडी) येथील नगरपरिषदेच्या स्वीकृत नगरसेवकपदी शिवसेना राष्ट्रवादी मित्र पक्ष आघाडीच्या वतीने सुभाष दत्तात्रय कोळेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आघाडीत ठरल्या नुसार किरण घोटणे यांनी राजीनामा दिल्याने या रिक्त पदावर कोळेकर यांची निवड करण्यात आली आहे. नगराध्यक्ष अमोल केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया पार पडली.

नगरपरिषदेचे स्वीकृत नगरसेवक किरण घोटणे यांनी एक वर्षाच्या कालावधीनंतर आघाडीत ठरलेल्या निर्णयानुसार आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. शिवसेना राष्ट्रवादी मित्र पक्ष आघाडीकडून सुभाष कोळेकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर माजी आमदार सत्यजित पाटील, नामदेव शिंपी समाज व राजाई महिला मंडळ यांच्या वतीने नगरसेवक सुभाष कोळेकर यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आजी माजी नगरसेवक कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

खुनाच्या घटनेतील आरोपीच्या भावाला घरात घुसून मारहाण

Patil_p

राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते पैलवान अप्पालाल शेख यांचे निधन

Abhijeet Shinde

ग्रामपंचायत विधेयकावरुन भाजपचा सभात्याग

Rohan_P

टाकळी, मल्लेवाडी, बोलवाड ओढ्याच्या पुलांची उंची वाढवा

Abhijeet Shinde

टेंबलाई देवीला मराठा बटालियनकडून साडी-चोळी अर्पण

Abhijeet Shinde

कोरोना विरोधात लढणाऱ्या पोलिस आणि पत्रकारांची आरोग्य तपासणी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!