तरुण भारत

क्वारटाईन असणाऱया व्यक्तीवर गुन्हा

रत्नागिरी

 होम कवाँरटाईन केलेले असताना देखील केस कापण्याचा व्यवसाय सुरु ठेवून ग्राहकाचे केस कापण्याचे निर्दशनास आल्याने एका विरोधात शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े

Advertisements

  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी रामप्रकाश मुषीलाल सेन (53 सध्या रा झोपडपट्टी, मुरुगवाडा मुळ आग्रा ) याचा केसकापण्याचा व्यवसाय आह़े संशयित आरोपी रामप्रकाश बुधवार 24 रोजी सकाळी 9.30 वा सुमारास भोळेवाडी मुरुगवाडा येथे हरीश्चंद्र पानगले यांचे केस कापत असल्याचे नाभिक संघटनेचे अध्यक्ष श्रीकृष्ण ऊर्फ बावा चव्हाण व बाळकृष्ण चव्हाण यांच्या निर्दशनास आले संशयित आरोपीला जिल्हाबाहेर प्रवासाचा इतिहास आह़े त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱयांनी त्याला कोरोनाच्या पार्श्वाभुमीवर होम क्वारटाईन करण्यात आले असताना देखील केस कापत असल्याचे आढळून आल़े दरम्यान त्याने आपत्ती कायद्याचे  उल्लंघन केल्यामुळे त्याच्या विरुद्ध शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आली आह़े याबाबतची फिर्याद पोलिस हेडकान्सटेबल जितेंद्र पालांडे यांनी दिली आह़े अधिक तपास पोलिस हेडकॉन्सटेबल कदम करत आहेत़

Related Stories

साटेली भेडशीतील दूरसंचार सेवा होणार सुरळीत

NIKHIL_N

परप्रांतियांना कोकण किनारपट्टी आंदण देण्याचा घाट!

NIKHIL_N

एमटीडीसी निवासात लग्न, वाढदिवस साजरे होणार!

Patil_p

गुहागरमध्ये कोविशील्ड लस दाखल, शनिवारी लसीकरण

Abhijeet Shinde

दुकान फोडून चोरटय़ाने 9 हजाराचा मुद्देमाल लांबवला

Patil_p

अन्नपूर्णा पित्रे यांचे निधन अल्पशा आजाराने निधन

NIKHIL_N
error: Content is protected !!