तरुण भारत

जिओ दूरसंचार क्षेत्रात देशात चमकणार

2019 मधील आकडेवारीचा समावेश : भारतीय कंपन्यांचा 9 टक्के हिस्सा, चिनी कंपन्यांना लगाम लावला जाणार

मुंबई 

Advertisements

 कोविडची महामारी आणि लॉकडाऊनच्या प्रभावामुळे देशातील उद्योगधंदे बंद असताना रिलायन्स इंडस्ट्रीज जिओमुळे 58 दिवसांमध्ये कर्जमुक्त झाली आहे. रिलायन्सच्या जिओ
प्लॅटफार्मकडून देशातील उद्योग क्षेत्रात आगामी काळात सकारात्मक बदल होण्याचे संकेत अभ्यासकांकडून व्यक्त केले जात आहेत. यात प्रामुख्याने चीनच्या अलिबाबा आणि अमेरिकेच्या ऍमेझॉन कंपनीच्या धर्तीवर आपला प्रवास करणार का? कारण कमी कालावधीत जी काही या कंपनीने गुंतवणूक केली आहे त्याच्या जोरावर हा प्रवास शक्मय होण्याचा अंदाज आहे. कारण जिओच्या प्लॅटफार्मवर आज 10 ते 15 सेवांचा समावेश आहे तर स्वतःकडे जवळपास 5 अब्ज डॉलरपेक्षा अधिकचे मार्केट उपलब्ध केले आहे.

भारत ही एक मोठी बाजारपेठ आहे. ज्यामध्ये मुकेश अंबानीच्या रुपाने पाहिल्यास सध्याच्या काळात जिओ ई कॉमर्सच्या पातळीवर, किरकोळ, ओटीटी सामग्रीसोबत पेमेंट प्लॅटफॉर्ममध्ये 2 ट्रिलियन डॉलर्सच्या उलाढालीची आहे. भारत अमेरिका आणि चीन यांच्यानंतर एक आकर्षक बाजारपेठ म्हणून उदयास येणार असल्याचे एका अहवालामधून सांगितले आहे.

अन्य कंपन्यांच्या तुलनेत जिओ

2 ट्रिलियन डॉलर बाजाराच्या पातळीवर पेमेंट करण्यासाठी जिओ दूरसंचारमध्ये येणारी गुंतवणूकदारांना आकर्षित केले आहे. अमेरिका आणि चीनमध्ये जागतिक वस्तूंची तुलना केली जाते. इकॉमर्स बाजारात ऍमेझॉनचा वाटा अमेरिकेत 40 टक्के आणि चीनच्या अलिबाबाचा हिस्सा हा 60 टक्के आहे. यावर आधारीत आगामी काळात 2025 मध्ये ई कॉमर्स रिटेल मार्केट 1.2 ट्रिलियन डॉलरचे होणार असल्याचा अंदाज आहे. यामध्ये देशातील जिओ प्लॅटफार्मला मोठय़ा प्रमाणात बळकटी मिळणार असून या दोन्ही कंपन्यांना आपला विकास साध्य करता येणार आहे.

दूरसंचार बाजार आणि जिओ

2021 ते 22 या कालावधीत जिओचा मासिक एव्हरेज रेव्हन्यू प्रति ग्राहक 53 टक्क्मयांनी वधारुन 200 रुपये होणार आहे. सध्या हा आकडा 131 रुपये आहे. तरी आगामी काळात दूरसंचार बाजारात जिओची हिस्सेदारी 45 टक्क्मयांच्या घरात जाणार असल्याचे संकेत ब्रोकरेज हाऊस यांनी दिले आहेत.

Related Stories

नेस्ले ग्रामीण भागावर लक्ष्य केंद्रीत करणार

Amit Kulkarni

निर्गुंतवणूक हाच योग्य मार्ग

Patil_p

मोबाईल टॉवर उभारण्याच्या नियमात शिथिलता

Patil_p

इन्फोसिससह अन्य कंपन्यांच्या कामगिरीने तेजी

Patil_p

एप्रिलमध्ये विजेचा वापर वाढला

Patil_p

शेअर बाजार शुक्रवारी घसरणीसह बंद

Patil_p
error: Content is protected !!