तरुण भारत

बाजारातील चार सत्रातील तेजीचा प्रवास थांबला

सेन्सेक्समध्ये 561 अंकांची घसरण : इंडसइंड बँकेचे समभाग नुकसानीत

वृत्तसंस्था / मुंबई

शेअर बाजारात मागील चार सत्रातील कामगिरीत तेजीचा प्रवास कायम राहिला होता. परंतु तो प्रवास बुधवारी थांबला आहे. जागतिक पातळीवरील वित्तीय कंपन्यांच्या समभागांच्या झालेल्या विक्रीमुळे सुरुवातीच्या वेळीच बाजाराने नुकसानीसोबत प्रारंभ केल्याने शेअर बाजारातील सेन्सेक्सची घसरण झाल्याचे पहावयास मिळाले असून जवळपास 561 अंकांनी मोठी घसरण होत बाजार बंद
झाला.

दिवसभरातील कामगिरीनंतर दिवसअखेर सेन्सेक्स 561.45 अंकानी घसरुन निर्देशांक 34,868.98 वर बंद झाला तर दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 165.70 अंकांनी घसरुन निर्देशांक 10,305.30 वर बंद झाला. व्यवहारा दरम्यान सेन्सेक्स 35,706.55 ते 34,794.93 वर कार्यरत राहिला होता. तसेच 10,553.15 ते 10,281.95 या दरम्यान निफ्टी कार्यरत राहिल्याची नोंद करण्यात आली आहे.

दिग्गज कंपन्यांमध्ये इंडसइंड बँकेचे समभाग सर्वाधिक सात टक्क्मयांपेक्षा अधिकने घसरले आहेत. आयसीआयसीआय बँक, पॉवरग्रिड कॉर्प, ऍक्सीस बँक, स्टेट बँक आणि भारती एअरटेल यांचे समभाग नुकसानीत राहिले आहेत. दुसऱया बाजूला मात्र एशियन पेन्ट्स, आयटीसी, नेस्ले इंडिया आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे समभाग नफ्यात राहिले आहेत.

सध्या उद्योगधंद्यांना शिथिलता मिळाल्याने शेअर बाजाराचा कल तेजीकडे राहिल्याचे पहावयास मिळत होते. परंतु याच कालावधीत वित्तीय कंपन्यांच्या समभागांची विक्री झाल्याचा परिणाम देशातील शेअर बाजारांनी नकारात्मक घेतल्याने बाजारात घसरण झाली आहे. याच दरम्यान युरोपीय बाजाराची कमकुवत सुरुवात झाली. यात पॅरिस आणि लंडन येथील बाजार दोन टक्क्मयांनी घसरले आहेत. आशियामधील बाजारांची हिच स्थिती राहिल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. बाजारात गुरूवारी कल कसा राहतो हे पाहावे लागणार आहे.

Related Stories

इंडिया सिमेंटस् ताब्यात घेण्यास दमानी उत्सुक

Patil_p

साखर उत्पादन 12 टक्क्मयांनी वाढणार ?

Patil_p

सांझ ढले…

Omkar B

आता गरज भक्कम आधाराची !

Omkar B

SBI कडून व्याजदरात कपात

datta jadhav

एलआयसीचा आयपीओ होणार उशिरा सादर

Patil_p
error: Content is protected !!