तरुण भारत

लॉकडाऊन शिथिलनंतर चोऱया वाढल्या

प्रतिनिधी/ बेळगाव

लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर चोऱया, घरफोडय़ांच्या घटनांत वाढ झाली आहे. मंगळवारी विजयनगर येथील एका सराफी दुकानातील नेक्लेस पळविण्याचा प्रयत्न करणाऱया तरुणाला पाठलाग करुन पकडण्यात आले आहे. त्याला चोप देवून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Advertisements

विजयनगर, पहिला क्रॉस जवळील समृध्दी ज्वेलर्समध्ये ही घटना घडली आहे. दुकानात गर्दीच्यावेळी आलेल्या एका तरुणाने नेक्लेस दाखविण्याची मागणी केली व ते नेक्लेस पळविण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी दुकान मालक व नागरिकांनी पाठलाग करुन त्याला चोप दिला आहे.

संतप्त जमावाने नेक्लेस पळविण्याचा प्रयत्न करणाऱया तरुणाला पकडून त्याला कॅम्प पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. जखमी तरुण हा मजगाव येथील राहणारा असल्याची माहिती मिळाली असून त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले आहेत.

नेक्लेस पळविताना त्याने पिस्तुलाची धाक दाखविल्याचे सांगण्यात येते. ती पिस्तुल पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. ती असली आहे की खेळण्यातील याची पडताळणी करण्यात येत आहे. कॅम्पचे पोलीस निरीक्षक संतोषकुमार पुढील तपास करीत आहेत. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमिवर झालेले लॉकडाऊन व निर्माण झालेली आर्थिक मंदीमुळे गुन्हेगारीच्या घटना वाढु लागल्या आहेत.

Related Stories

एस.जी.बाळेकुंद्री कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ

Patil_p

कृष्णा नदीच्या पातळीत 10 फुटांनी वाढ

Patil_p

पोलीस-आरटीओकडून होणारा त्रास थांबवा

Patil_p

कोरोना चाचणासाठी प्रयोगशाळा आता बेळगावऐवजी हुबळीत

Patil_p

शाळाबाहय़ मुलांचे सर्वेक्षण

Patil_p

ड्रेनेजसाठी कपिलेश्वर कॉलनीत पुन्हा खोदाई

Amit Kulkarni
error: Content is protected !!