तरुण भारत

दहावी परीक्षेची रंगीत तालीम यशस्वी

प्रतिनिधी/ बेळगाव

कोरोनाच्या संकटछायेत शालेय जीवनाचा अंतिम टप्पा असणारी दहावीची परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी बुधवारी रंगीत तालीम घेण्यात आली. प्रवेश केंद्रात प्रवेश करण्यापासून वर्गखोलीतील बैठक क्रमांक तपासून आसन ग्रहण करण्यापर्यंतची प्रक्रिया डेमोच्या माध्यमातून सादर करण्यात आली. प्रत्येक केंद्रांवर सामाजिक अंतर राखले जावे व विद्यार्थ्यांनी बैठक क्रमांक पाहण्यासाठी गर्दी करू नये, यासाठी एक दिवस आधीच परीक्षेच्या व्यवस्थेची रंगीत तालीम पार पडली. संबंधित केंद्रांवर विद्यार्थ्यांनी हजेरी लावत प्रात्यक्षिकात सहभाग घेत सूचनांचे पालन करत बैठक व्यवस्था तपासून पाहिली. यामुळे परीक्षा केद्रांवर बुधवारीच परीक्षामय वातावरण पहायला मिळाले.

Advertisements

गुरुवार दि. 25 जूनपासून दहावीची परीक्षा घेण्यात येणार असल्याने त्याच पार्श्वभूमीवर मॉक टेस्टिंग करण्यात आले. सकाळी 10 पासून दुपारपर्यंत विद्यार्थी परीक्षा केंद्रावर दाखल होत होते. परीक्षा केंद्रावर प्रवेश केल्यानंतर आखून दिलेल्या चौकटीत थांबून सॅनिटायझर लावून, थर्मल स्क्रिनिंक करून फलकावर लावलेल्या बैठक व्यवस्थेनुसार विद्यार्थी बैठक क्रमांक तपासून पाहत होते. विद्यार्थ्यांना परीक्षेबाबतच्या सूचना तसेच पाळावयाचे नियम याची माहिती देण्यात आली. यामुळे गुरुवारी होणाऱया परीक्षेची रंगीत तालीम विद्यार्थ्यांच्यादृष्टीने लाभदायक ठरली.

परीक्षा केंद्रे सज्ज

परीक्षा केंद्रे मंगळवारी सर्व व्यवस्थेने सज्ज झाली होती. यामुळे जणू बुधवारीच परीक्षा असल्याप्रमाणे प्रवेशद्वाराजवळ सुरक्षारक्षकांकडून चौकशी करून पेंद्रात प्रवेश देण्यात आला. पेंद्रांसमोरच बैठक क्रमांकांचा फलक लावण्यात आला होता. दोरी बांधून सुरक्षा ठेवण्यात आली होती. परीक्षा केंद्राचा नकाशा आखून त्याचे चित्र फलकावर लावण्यात आले आहे. केंद्रावर केवळ विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्यात आला. मात्र सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून प्रत्येक वर्गखोलीत औषधाची फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आले. प्रत्येक बाकामध्ये तीन फुटाचे अंतर राखत बैठक व्यवस्था करण्यात आली असून कोविड-19 मध्ये सुरक्षिततेच्यादृष्टीने विशेष दक्षता घेऊन परीक्षा केंद्रे सज्ज झाल्याची दिसून आली.

Related Stories

मंत्री रमेश जारकीहोळी यांच्याकडून विमल फौंडेशनचे कौतुक

Patil_p

बहिणाबाईंनी जे भोगलं ते कवितेतून मांडलं!

Amit Kulkarni

हणमापूर क्रॉसजवळ 30 किलो चंदन जप्त

Amit Kulkarni

पोलीस मुख्यालयात खंडेनवमी पूजन

Amit Kulkarni

तालुक्यात प्लास्टिक विक्री करणाऱयांवर होणार कडक कारवाई

Patil_p

किणये जवळ गोवा बनावटीची दारु जप्त

Rohan_P
error: Content is protected !!