तरुण भारत

म्हापशातही कोरोनाचा प्रवेश

प्रतिनिधी/ पणजी

म्हापसा खोर्ली भागातील गंगानगर येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे म्हापसा पालिकेकडून प्रभाग क्रमांक 14 व 15 सील करण्यात आले आहेत. या भागातून वाहनांना ये जा करण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे.

 म्हापशाचे आमदार जोसुआ डिसोझा यांनी बुधवारी दुपारी घटनास्थळी पाहणी केली. पोलिसांनी या भागात फिरण्यास सर्वांना मनाई करावी, अशी सूचना आमदारांनी केली आहे. 

गंगानगर येथील ही व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल मंगळवारी म्हापसा आरोग्य केंदात आला होता, अशी माहिती डॉ. सिरिल डिसोझा यांनी दिली. त्यानंतर त्या रुग्णास कोविड केअर सेंटर शिरोडा येथे पाठविण्यात आले. बुधवारी सकाळी म्हापसा आरोग्य खात्याच्या डॉक्टरांच्या पथकाने त्या रुग्णाच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबियांचे स्वॅब नमूने गोळा केले. सर्व कुटुंबियांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. या भागात 230 नागरिक राहत असून यातील 150 जणांचे स्वॅब नमूने चाचणीसाठी घेण्यात आले आहेत.

Related Stories

अमेरे पोरस्कडेत महामार्ग नदीत कोसळला

Omkar B

बहुजन समाजाला खंबीर पाठबळ देणार

Patil_p

वाघाच्या नखांचा शोध घेण्याचे वनखात्याच्या तपासणी यंत्रणा समोर आव्हान.

Patil_p

शिवडे धारबांदोडय़ातील चोरटय़ा जलवाहिन्या तोडल्या

Omkar B

स्टेट-गोवा प्रकल्पांतर्गत आरोग्य सेवा संचालनालयाने हेल्थवे हॉस्पिटलशी भागीदारी करण्यासाठी सामंजस्य करार

Patil_p

अंतिमसंस्कार साहित्याची विनामूल्य सेवा

Omkar B
error: Content is protected !!