तरुण भारत

सीबीएससी, आयसीएसई बोर्डाच्या दहावी बारावीच्या परीक्षा रद्द : सुप्रीम कोर्ट

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आलेल्या आणि 1 ते 15 जुलैदरम्यान होणाऱ्या सीबीएससी बोर्डाच्या दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आला आहे. याबरोबरच आयसीएसई बोर्डाने ही दहावी बारावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. 

Advertisements

सीबीएसईच्या दहावी-बारावीच्या परीक्षांवरून आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यावेळी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले की, महाराष्ट्र, दिल्ली आणि ओडिशा राज्यांनी सध्याच्या परिस्थितीत परीक्षा घेण्यास असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे एक ते 15 जुलै दरम्यान होणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. विद्यार्थ्यांना मागील तीन वर्गात मिळालेल्या गुणांचं मूल्यमापन करून मूल्यमापन केलं जाणार आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांचं मंडळानं दिलेल्या गुणांवर समाधान होणार नाही, त्यांनी नंतर बोर्डाकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षा देऊ शकतात.

सीबीएससी प्रमाणे आयसीएसई बोर्डाने देखील परीक्षा घेण्यास असमर्थता दर्शविल्याने या बोर्डाच्याही दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आले आहेत.  

Related Stories

धर्मांतरांमुळे सामाजिक ताणतणावांमध्ये वाढ

Patil_p

कर्नाटकात कोरोनाबाधितांची संख्या शतक पार

Patil_p

TokyoOlympics: भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा, अंकिता रैना पराभूत

Abhijeet Shinde

आप आमदारांच्या विरोधात आरोप निश्चित

Patil_p

मौलाना सादचा थांगपत्ता लागला?

Patil_p

अर्थव्यवस्था सुधारण्याच्या मार्गावर

Patil_p
error: Content is protected !!