तरुण भारत

राष्ट्रवादीने पडळकरांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला, प्रतिमेला मारले जोडे

प्रतिनिधी / सातारा


राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या विरोधात भाजपाचे आमदार गोपिचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कार्यालयासमोर काही कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱयांनी पडळकर यांच्या प्रतिकात्मक पुतळयाचे दहन केले. तेथून पोवई नाका येथे प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारुन निषेध व्यक्त करण्यात आला. शहर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेवुन सोडून देण्यात आले. गोपीचंद पडळकर यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.

Advertisements

या आंदोलनात जिल्हाध्यक्ष सुनिल माने, शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, दीपक पवार, सटचिटणीस राजकुमार पाटील, युवकचे अध्यक्ष तेजस शिंदे, विद्यार्थी सेलचे अध्यक्ष अतुल शिंदे, गोरख नलवडे, महिला जिल्हाध्यक्षा समिंद्रा जाधव, जयश्री पाटील, कविता म्हेत्रे, कुसुमताई भोसले, स्मिता देशमुख, पुजा काळे, नागेश साळुंखे, सनी शिर्के, प्रतिक कदम, गिरीश फडतरे, वैभव मोरे, महेश जाधव, विकास अवघडे, शुभम साळुंके, मंगेश ढाणे, प्रथमेश बाबर, सागर जगदाळे, राहुल साबळे, अमर माने, स्वप्निल डोंबे, सुरेश गायकवाड, वनराज कदम, प्रकाश येवले, पांडुरंग भोसले, नलिनी जाधव, सागर जगताप आदी सहभागी झाले होते. या आंदोलनाची सुरुवात राष्ट्रवादी भवनापासून झाली. तेथे घोषणा देत प्रतिकात्मक पुतळय़ाचे दहन करण्यात आले. मोर्चा काढून पोवई नाका येथे प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारण्यात आले. पोलिसांनी वेळीच सर्व कार्यकर्त्यांना पोलीस व्हॅनमधून शहर पोलीस ठाण्यात आणले. तेथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नावे नोंदवून सोडून देण्यात आले.

Related Stories

सिडनीत कोरोनाने वाढवली चिंता 17 जुलैपर्यंत निर्बंध

Patil_p

सातारा : जिल्ह्यातील 186 संशयितांचे अहवाल आले कोरोना बाधित तर 4 बाधितांचा मृत्यु

Abhijeet Shinde

बेळगावला सलग तिसऱया दिवशीही दिलासा

Patil_p

कोरोनाशी लढण्यासाठी नागठाण्यात निवृत्त फौजींनी चढवली वर्दी

Patil_p

सोलापूर : चार रुग्ण पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

मेक्सिकोत भूकंप; त्सुनामीची शक्यता

datta jadhav
error: Content is protected !!