तरुण भारत

खानापूर तालुक्मयात दहावीचा पहिला पेपर सुरळीत

खानापूर / वार्ताहर :

  खानापूर तालुक्मयात गुरुवारी प्रथम विषयाचा दहावी इंग्रजी माध्यमाचा पेपर सुरळीत पार पडला. तालुक्मयात एकूण 14 परीक्षा केंद्रांमध्ये 3878 विद्यार्थी पात्र होते. सर्वच विद्यार्थ्यांनी गैरहजर न राहता परीक्षा दिल्याने तालुका प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला. तालुक्मयातील प्रत्येक परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना गैरसोयीचे होणार नाही याची दक्षता घेण्यात आली होती. प्रत्येक विद्यार्थ्यांना सकाळी 8 पासून परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यात आला. प्रवेशद्वारावर मंडप घालून त्या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्यांचे थर्मल स्क्रिनींग सानिटायझर करून तसेच त्यांची नोंद करूनच त्यांना केंद्रात प्रवेश देण्यात आला.

Advertisements

 तब्बल तीन महिन्याच्या विश्रांतीनंतर दहावी परिक्षेला अखेर सुरवात झाली.     इंग्रजीचा पहिलाच पेपर असल्याने बहुतांश विद्यार्थ्यांत परीक्षा केंद्रावर कोणती निर्बंधने लादली जातील, याची धास्ती होती. यामुळे अनेक विद्यार्थी दबावाखाली असल्याचे दिसून येत होते. परंतु प्रत्यक्षात परीक्षा केंद्राच्या आत प्रवेश केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेविषयीची जी धास्ती होती ती दूर झाल्याचे चित्र दिसून  आले.

  प्रत्येक परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांच्या थर्मल स्क्रिनिंग व तपासणीसाठी सुरक्षित अंतरावर उभारून त्यांना रांगेने प्रवेश देण्यात आला. परंतु अनेक परीक्षा केंद्राच्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या अधिक असलेल्या केंद्रावर एकाचवेळी गर्दी झाल्याचे दिसून येत होते. नंदगड महात्मा गांधी कॉलेजच्या ठिकाणी असलेल्या परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांच्या रांगाच्या रांगा लागल्या होत्या. एका बाजूला विद्यार्थी तर एका बाजूला विद्यार्थिनी अशी सुविधा करण्यात आली असली तरी बराच वेळ विद्यार्थ्यांना केंद्राबाहेर ताटकळावे लागले. यासाठी शनिवारी होणाऱया विषयाच्या पेपरसाठी विद्यार्थ्यांना सोयीचे व्हाव, याकरिता प्रत्येक परीक्षा केंद्रावर व ज्या ठिकाणी गर्दी होणार आहे अशा ठिकाणी ज्यादा एक तपासणी केंद्र उपलब्ध करावे, अशी मागणी पालक वर्गातून केली जात आहे.

प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात आला आहे. फिरते पथक, बैठा पथक तसेच वरि÷ पथकातील काही अधिकाऱयांनी करडी नजर ठेवून परीक्षा केंद्रात कोणताच गैरव्यवहार होणार नाही याकडे लक्ष केंद्रित केले होते. परीक्षा केंद्रातील प्रत्येक वर्गात सुरक्षित अंतर ठेवून परीक्षार्थींना टेबल रचना करून देण्यात आली. मात्र परीक्षा केद्राच्या बाहेर सुरक्षित अंतराचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसत होते. प्रत्येक परीक्षा केंद्रावर सकाळी 8 पासून विद्यार्थ्यांची रीघ लागली होती.  परंतु सकाळी 10.30 पर्यंत विद्यार्थ्यांना तासभर परीक्षा केंद्रात वेळ काढावा लागला. परीक्षा केंद्राच्या बाहेर पोलीस प्रशासनानेही चोख बंदोबस्त केला होता. त्यामुळे अनेक परीक्षा केंद्राच्या बाहेर नाहक त्रास करणाऱयांची संख्याही कमी दिसून येत होती.

  तालुक्मयातील विशेषतः विद्यार्थ्यांची मानसिकता बदलून परीक्षा देण्यासाठी पात्र झालेले पालक वर्ग तसेच तालुका तहसीलदार, आरोग्य अधिकारी, पोलीस खाते व शिक्षक वर्गाने दिलेल्या सहकार्याबद्दल गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण यकुंडी यांनी विशेष कृतज्ञता व्यक्त केली आहे. अशाच प्रकारे पुढील पाचही विषयाचे पेपर सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, विद्यार्थ्यांच्यावर परीक्षेविषयी कोणताही ताण येणार नाही यावर लक्ष ठेवून कार्यप्रणाली हाती घेण्याचे कार्य त्यांनी घेतले असल्याचे सांगितले.

आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांचे विद्यार्थ्यांसाठी योगदान

खानापूर तालुक्मयाच्या शैक्षणिक विकासासाठी नेहमी कार्यरत राहणार.  तालुक्मयाच्या आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी फाऊडेशनच्यावतीने प्रत्येक परीक्षा केंद्रासमोरील प्रवेशद्वारावर कार्यकर्त्यांना उभा करून मास्क, सानिटायझर तसेच साबणसह कंपास विद्यार्थ्यांना वितरित केले. वास्तविक ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी मास्कचा वापर सक्तीचे केले होते. आमदार अंजली निंबाळकर यांनी यापूर्वीच प्रत्येक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर मास्कसह सहित्याचे वाटप करून विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी प्रोत्साहित केले आहे. कोरोना महामारीच्या गंभीर काळात अती दक्षता म्हणून विद्यार्थ्यांच्या हितावह मास्क साहित्याचे वाटप करून आपल्या शैक्षणिक इच्छा शक्तीबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये महत्त्व पटवून दिर्ल्याबद्दल विद्यार्थीसह पालक वर्गातून कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे.

Related Stories

सुदैवाने मोठा अनर्थ टळला

Patil_p

बेळगाव आयएमएच्या हेल्पलाईनला लक्षणीय प्रतिसाद

Amit Kulkarni

अनगोळ येथील नागरिक विजेच्या समस्येने हैराण

Amit Kulkarni

जुने बेळगाव येथील युवकाचा खून

Patil_p

वर्दळीमुळे रामघाट रस्ता बनला जीवघेणा

Amit Kulkarni

रेल्वे बसस्थानकाच्या नवीन स्वच्छतागृहात खचली जमीन

Patil_p
error: Content is protected !!