तरुण भारत

युटीआय म्युच्युअलचे आयपीओमधून 3,500 कोटी उभारण्याचे ध्येय

वृत्तसंस्था / मुंबई : :

देशातील सातव्या नंबरची म्युच्युअल फंड कंपनी म्हणून युटीआयला ओळखले जाते. या कंपनीने आपला आयपीओ सादर करणार असल्याची घोषणा नुकतीच केली आहे. यामध्ये 850 ते 900 रुपयापर्यंत आयपीओ मूल्य निश्चित करणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. यातून कंपनी येत्या काळात 3,000 ते 3,500 कोटी रुपयांची उभारणी करण्याची योजना असल्याचे स्पष्टीकरण युटीआयने दिले आहे.

Advertisements

चालू आठवडय़ात सेबीने आयपीओला मंजुरी दिली आहे. मागील आठवडय़ात कंपनीमध्ये स्थायीपणे एमडीची नियुक्ती केली आहे. कारण मागील दोन वर्षापासून हे पद खाली होते. सध्या या पदाची नियुक्ती झाल्याने कंपनीला नवीन ध्येय धोरणे साध्य करणे शक्मय होत असल्याचे म्हटले जात आहे.

भारतीय बाजारात आतापर्यंत दोनच म्युच्युअल फंड कंपन्या लिस्टेड आहेत. यामध्ये एचडीएफसी आणि निप्पान म्युच्युअल फंड यांचा समावेश होतो. युटीआय ही तिसरी कंपनी असून जी लिस्टेड होणार आहे. युटीआयमध्ये सरकारी कंपन्या एलआयसी, स्टेट बँक , पीएनबी आणि बँक ऑफ बडोदा यांना आपली हिस्सेदारी कमी करावयाची असल्याचीही माहिती आहे. सदरच्या चार कंपन्यांची युटीआयमध्ये 18.5 ते 18.5 टक्के इतकी हिस्सेदारी आहे. अन्य कंपन्यांमध्ये 26 टक्के हिस्सेदारी विदेशी कंपनी टी रोवे प्राइस यांच्याकडे आहे.

एलआयसी, एसबीआय, बडोदा बँक विकणार समभाग

एलआयसी, एसबीआय आणि बँक ऑफ बडोदा हे 1.05 कोटी इक्विटी समभाग विकणार आहे तर पीएनबी आणि टी रोवे प्राइस ऑफर फॉर सेलच्या आधारे 38.04 लाख समभाग विकणार आहे.

Related Stories

स्पेक्ट्रम लिलावात रिलायन्स भारी

Patil_p

अन्नधान्याचे उत्पादन दोन टक्क्यांनी वाढणार ?

Amit Kulkarni

मायक्रोसॉफ्टला तिमाहीत 81 हजार कोटींचा नफा

Patil_p

पुढील वर्षी जूनपर्यंत 50 ते 60 लाख जणांना रोजगार

Patil_p

ऍमेझॉनकडून लवकरच हजारोंना रोजगार

Patil_p

गुवाहाटी विमानतळ आता अदानी समूहाकडे

Patil_p
error: Content is protected !!