तरुण भारत

शिक्षकांच्या जागा रिक्त असताना आंतरजिल्हा बदलीचा घाट

शिक्षकांच्या 550 जागा रिक्त

75 शिक्षकांची आंतरजिल्हा बदली होणार?

बदली प्रकरणात अर्थकारण असल्याचा माजी शिक्षण सभापतीचा आरोप

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

संपूर्ण जिह्यात प्राथमिक शिक्षकांच्या 550 जागा रिकाम्या असताना आणखीन 75 शिक्षकांची आंतरजिल्हा बदली परवानगी देण्याचा घाट जि. प. च्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱयांनी घातला आहे. जिल्हय़ातील बरेच शिक्षक हे परजिल्हय़ातील आहेत. कोविड-19 चा विळखा जिल्हय़ात वाढत असताना आंतरजिल्हा बदली करण्याच्या प्रकाराला अर्थकारणाचा वास येत आहे, असा आरोप जि. प. च्या माजी शिक्षण सभापती डॉ. अनिशा दळवी यांनी केला आहे.

10 पटसंख्या असलेल्या बऱयाचशा शाळा एकशिक्षकी असल्याने त्या शाळा बंद पाडण्याचा धोका उद्भवू शकतो. ?नवीन शिक्षकभरती झाल्याशिवाय बदलीने जाणाऱया शिक्षकांना कार्यमुक्त करू नये, असा ठराव शिक्षण समिती व जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत झाला असताना सदर ठरावाला ठेंगा दाखवून शिक्षणाधिकाऱयांनी मागील वषी 176 शिक्षकांना कार्यमुक्त केले. याचा विपरित परिणाम येथील प्राथमिक शाळांच्या दर्जावर व परिणामी पटसंख्येवर झाला. शिक्षणधिकारी मनमानी करून शिक्षक बदल्या करून आधीच बेजार असलेली जिल्हय़ातील शिक्षणव्यवस्था कोलमडण्यास हातभार लावत आहेत. सिंधुदुर्ग जिल्हय़ातील विद्यार्थ्यांच्या भविष्याशी आणि शिक्षणव्यवस्थेशी खेळणाऱया या अधिकाऱयांवर कारवाई करावी, अशी मागणी डॉ. सौ. दळवी यांनी केली आहे.

शिक्षण विभाग प्रक्रिया संशयास्पद

अब्दुल कलाम प्रज्ञा शोध परीक्षा व सिंधू एज्युकेशन एक्स्पो सारख्या चांगल्या उपक्रमाकडे शिक्षणाधिकाऱयांनी दुर्लक्ष केले आहे. शालेय क्रीडास्पर्धा दरम्यान अपघातग्रस्त मुलांच्या मदतीची फाईल वर्षभर लाल फितीमध्ये अडकवून ठेवली जाते. परंतु आंतरजिल्हा बदलीची फाईल काही तासांत क्लिअर करण्यात येते. ही सर्व प्रकिया संशयासपद आहे. शाळा दुरुस्तीकडे सुद्धा या प्रशासनाने स्पेशल दुर्लक्ष केले असून अनेक शाळा धोकादायक स्थितीत असून यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितहानी झाल्यावर दुरुस्त करणार का? असा सवालही सौ. दळवी यांनी केला आहे.

बदलीच्या शिक्षकांना कार्यमुक्त करू नका!

जिल्हय़ात नवीन शिक्षकभरती झाल्याशिवाय बदलीच्या शिक्षकांना कार्यमुक्त करू नये. जितके शिक्षक जिल्हय़ात येतील तितकेच शिक्षक कार्यमुक्तीसाठी रितसर शिक्षण समिती सभा व जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेसमोर ठेवून पुढील कारवाई करावी, अन्यथा विद्यार्थ्यांच्या होणाऱया शैक्षणिक नुकसानाला शिक्षणाधिकारी जबाबदार असतील. जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱयांनी स्वतः यात लक्ष देऊन विद्यार्थ्यांच्या भविष्यास धोकादायक असलेला हा खेळ थांबवावा अशी मागणी माजी सभापती डॉ. अनिशा दळवी यांनी केली आहे.

Related Stories

‘महाविकास’ची सरशी, राजापुरात सेनेला ठेंगा

Patil_p

भीषण आगीनंतर ‘दुर्गा फाईन’ मध्ये 15 स्फोट !

Patil_p

कामळेवीरला काजू बागेत वणवा

NIKHIL_N

मराठा समाजाचे प्रश्न मार्गी लावा!

NIKHIL_N

कारमध्ये गुदमरून दोन सख्ख्या चिमुरडय़ा भावंडांचा करूण अंत

Patil_p

कोकण प्रवेशासाठी आजची ‘डेडलाईन’!

Patil_p
error: Content is protected !!