तरुण भारत

एसीबीच्या छाप्याने बेळगावात खळबळ

नेहरुनगर, महांतेशनगर, रामतीर्थनगर येथील चार कार्यालयांवर छापे

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

एसीबीच्या अधिकाऱयांनी गुरुवारी चार शासकीय कार्यालयांवर छापे टाकले आहेत. नेहरुनगर, महांतेशनगर, रामतीर्थनगर येथे केलेल्या या कारवाईमुळे एकच खळबळ माजली आहे. रात्री उशीरापर्यंत चारही कार्यालयात कागदपत्रांची तपासणी सुरु होती.

रामतीर्थनगर येथील कर्नाटक अल्पसंख्यांक विकास निगम, नेहरुनगर येथील देवराज अर्स मागासवर्गीय विकास निगम, महांतेशनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विकास निगम व वाल्मिकी विकास निगमच्या कार्यालयावर छापे टाकण्यात आले आहेत. गुरुवारी दुपारपासूनच ही कारवाई सुरु आहे.

चार कार्यालयावर छापे टाकण्यासाठी केवळ बेळगावच नव्हे तर गदग, बागलकोट  व धारवाड येथील एसीबीच्या अधिकाऱयांनाही पाचारण करण्यात आले आहे. एसीबीचे पोलीस प्रमुख बी. एस. नेमगौडा यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपअधिक्षक शरणाप्पा, पोलीस निरीक्षक ए. एस. गुदीगोप्प, सुनीलकुमार, धारवाडचे पोलीस निरीक्षक बी. ए. जाधव आदींसह 40 हून अधिक अधिकारी या कारवाईत सहभागी झाले आहेत.

या चारही विकास निगम संबंधी एसीबीकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. वेळेत लाभार्थ्यांची कामे केली जात नाहीत. अशा तक्रारी होत्या. या तक्रारींच्या पार्श्वभूमिवर गुरुवारी एकाचवेळी एसीबीने धडक मोहीम राबविली असून रात्री उशीरापर्यंत या चारही कार्यालयात तपासणी सुरु होती.

एसीबीच्या अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार या कार्यालयात आलेल्या अर्जांची संख्या व त्यापैकी अधिकारी व कर्मचाऱयांनी किती अर्ज हातावेगळै केले आहेत. कामे प्रलंबित का आहेत? कामांसाठी लाभार्थींकडून लाच स्वीकारण्याचे प्राकर आदी विषयीं चौकशी करण्यात येत आहे. या कारवाईमुळे सरकारी अधिकाऱयांमध्ये खळबळ माजली आहे.

Related Stories

क्लिनरना कमी करण्यात आल्याने आयुक्तांकडे तक्रार

Patil_p

अंकलीत रेणुका देवी यात्रा उत्साहात

Omkar B

शहरासह ग्रामीण भागात थंडी कायम

Amit Kulkarni

बेळगाव-धारवाड रेल्वे मार्गाला केंद्राचा हिरवा कंदील

Rohan_P

खानापूर-रामनगर महामार्गाचे काम आठ दिवसात सुरू करा

Amit Kulkarni

माही पोर्णिमेनिमित्त यल्लम्मा देवीची यात्रा साधेपणाने

Amit Kulkarni
error: Content is protected !!