तरुण भारत

भारताच्या मदतीसाठी आता अमेरिकन फौजा

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

लडाख सीमावादावर भारत आणि चीनमध्ये झालेल्या बैठकीतील करार मोडीत काढत चीनने पुन्हा एकदा लडाखच्या डेपसांग भागात सैन्य आणि शस्त्र जमवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे गरज पडल्यास भारताच्या मदतीसाठी आता अमेरिकन फौजा उपलब्ध होणार आहेत. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

चीनमुळे भारतासोबतच आग्नेय आशियाला धोका निर्माण झाला आहे. व्हिएतनाम, इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपीन्स या देशांनाही चीनकडून धोका आहे. त्यामुळे अमेरिकेकडून जगभरात तैनात असलेल्या सैन्याचा आढावा घेतला जात आहे.  चीनच्या दादागिरीला आळा घालण्यासाठी आता अमेरिका भारताची मदत करणार आहे. 

अमेरिका आपले युरोपातील सैन्य आशियामध्ये हलवणार आहे. त्याची सुरुवात जर्मनीपासून होईल. अमेरिका जर्मनीमध्ये तैनात असलेल्या 52 हजार अमेरिकन सैनिकांपैकी आशियामध्ये 9,500 सैनिक तैनात करणार आहे. पूर्व लडाखमधील सीमारेषेवरून निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीवर अमेरिका हे पाऊल उचलत असल्याची माहिती पॉम्पिओ यांनी दिली.

Related Stories

भाजप खासदार रामस्वरूप शर्मा यांची दिल्लीत आत्महत्या

triratna

ऑनलाईन वर्ग सुरू झालेल्या परदेशी विद्यार्थ्यांचे व्हिसा रद्द होणार

datta jadhav

अनंतनागमधील चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा

datta jadhav

काश्मीरचा ‘स्वर्ग’ लोकांसाठी खुला

Patil_p

श्रमिक विशेष ट्रेन उत्तरप्रदेशातील बलियाऐवजी पोहचली नागपूरला

datta jadhav

रेल्वेची अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करू : अनिल देशमुख

prashant_c
error: Content is protected !!