तरुण भारत

सर्दी, पडसे, कफ विकाराच्या रुग्णांत घट

लोकांमधील अलर्टनेस, स्वत:च्या काळजीची सवय वाढली : हवेतील प्रदूषण कमी झाल्याचाही होतोय फायदा : मास्क, हात धुणे आदींचाही चांगला लाभ : इमर्जन्सी रुग्णच येतात दवाखान्यांमध्ये

चंद्रशेखर देसाई / कणकवली:

Advertisements

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हय़ात प्रत्येकाने स्वत:ची काळजी घेण्यास सुरुवात केल्यानंतर जिल्हय़ातील श्वसनाचे विकार, सर्दी, पडसे, कफ विकार अशा रुग्णांची संख्या कमालीची घटल्याचे दिसून आले आहे. यात केवळ डॉक्टरांकडेच जाणे नव्हे, तर औषध दुकानांमध्येही अशा आजारासाठी औषधे नेण्यासाठी येणाऱयांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे पुढे आले आहे. हवेतील कमी झालेले प्रदूषण, मास्कचा वापर, वेळेत जेवण, जंकफूडचे कमी सेवन व शारीरिक काळजी घेण्याची लोकांना लागलेली सवय यामुळे ‘इमर्जन्सी’ वगळता इतर आजारांसाठी दवाखान्यांत येणाऱया रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे डॉक्टर्स व औषध विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.

जिल्हय़ात मार्च महिना अर्धा झाला अन् कोरोनाबाबतची जागृती सुरू झाली. तेव्हापासून आतापर्यंत तीन महिन्यांचा सरासरी विचार केला, तर शासकीय व खासगी दवाखान्यांमध्ये येणाऱया रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे दिसत आहे. सुरुवातीच्या काळात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी होत असताना इमर्जन्सी असलेले रुग्णच दवाखान्यात येत होते. त्यामुळे शासकीयसह खासगी दवाखान्यांच्या बाहय़ रुग्ण विभागावरही मोठा परिणाम झालेला होता.

श्वसन विकार, सर्दी प्रमाण कमी

गेल्या काही दिवसांचा विचार केल्यास हवेच्या प्रदूषणामुळे होणाऱया आजारांच्या प्रमाणात घट झाल्याचे दिसते. यात वातावरणात बदल झाल्याने होणारे सर्दी, पडसे याच्या रुग्णात घट झाल्याचे दिसून येते. सुरुवातीच्या काळात लोक घरातून बाहेर पडण्याचे प्रमाण कमी झाल्याने व्हायरल आजारांसाठीचा संसर्ग कमी झाला. मास्कचा किंवा तोंडावर रुमाल बांधण्याची करण्यात आलेली सक्ती ही यासाठी फायदेशीर ठरल्याचे दिसत आहे.

रुग्ण संख्येत घट

याबाबत येथील स्त्राrरोगतज्ञ डॉ. अनंत नागवेकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांमध्ये आलेला ‘अलर्टनेस’ हेही छोटे-मोठे त्रास कमी होण्यामागील प्रमुख कारण आहे. शहरासंह ग्रामीण भागातील वाहनांच्या संख्येत घट झाली. त्याचा परिणाम होऊन हवेतील प्रदूषण कमी झाले. जंक फूडचे प्रमाण घटले. लोक वेळच्यावेळी जेवणे, स्वत:ची काळजी घेणे, मास्कचा वापर करणे अशा गोष्टी काळजीपूर्वक करू लागल्याने अशा आजारांच्या रुग्णसंख्येत घट झाली आहे. सर्दी, पडसे, व्हायरल इन्फेक्शनच्या प्रमाणातही मोठी घट झाली आहे. सद्यस्थितीत अत्यावश्यकसाठीच रुग्ण हॉस्पिटलमध्ये येत असल्याचे दिसते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही पद्धत अजून काही काळ राहील. मात्र, लोकांनी अशी काळजी घेतल्यास प्रदुषणामुळे होणारे व्हायरल इन्फेक्शनचे प्रमाण घटेल.

कफ, सर्दी पडशाच्या औषध विक्रीत घट

याबाबत येथील उबाळे मेडिकल अँड जनरल स्टोअर्सचे मालक, केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष दयानंद उबाळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, नियमित औषधे सुरू असलेल्या रुग्णांची औषधे सुरू आहेत. मात्र, सर्दी खोकल्याच्या त्रासाच्या औषधांसाठी येणाऱया रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. अशा औषधांसाठी येणाऱयांच्या संख्येत सुमारे 60 ते 70 टक्के घट झाल्याचे दिसून येते. मास्क, सॅनिटायझर, हँडवॉश अशा प्रतिबंधात्मक उपायांसाठी, काळजी घेण्याच्या उपायांसाठीच्या उत्पादनांच्या विक्रीत वाढ झाली आहे.

आजाराला प्रतिबंधासाठी केलेल्या उपाययोजनांचा फायदा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेले लॉकडाऊन व नंतर आयुष मंत्रालय असेल किंवा स्थानिक पातळीवर या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी सूचविण्यात आलेल्या उपाययोजनांचाही वापर बऱयाच ठिकाणी केला जात असल्याचे दिसून येते. गरम पाणी, काढा, हळदयुक्त दूध, कोणतीही गोष्ट खाताना, पिताना हात स्वच्छ धुण्याबाबतची वाढलेली सवय अशा अनेक गोष्टींमुळे लोकांमध्येच जागरूकता आल्याचे दिसून आले आहे. या साऱयाचा चांगला परिणाम लोकांच्या आरोग्यावर होताना दिसत असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.

Related Stories

पांढऱया चिपीचे होणार जतन, संरक्षण!

Patil_p

आस्था ग्रुप धावला ग्रामीण भागातील लोकांसाठी

NIKHIL_N

आंबोली-चौकुळ मार्गावर रेडियम कॅटआय बसवा!

NIKHIL_N

आता पुरे करा ही नौटंकी

NIKHIL_N

वनविभागाचे आता मिशन बांबू

NIKHIL_N

दारू-जुगार-गांजा-गुटखा धाडीत साडेसतरा लाखांचा मुद्देमाल जप्त

Patil_p
error: Content is protected !!