तरुण भारत

तीन दहशतवाद्यांचा अवंतीपोरामध्ये खात्मा

श्रीनगर / वृत्तसंस्था

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्हय़ातील अवंतीपोरा येथे जवानांनी एका चकमकीत तीन दहशतावाद्यांचा खात्मा केला. चकमकीनंतर तिन्ही दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून घटनास्थळावरून शस्त्रास्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. अवंतीपोरामधील त्राल परिसरात गुरुवारपासून शोधमोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेला यश मिळाले असून भारतीय सैनिकांनी तीन दहशतवाद्यांना यमसदनी पाठवले आहे. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये श्रीनगर येथील फारूक लंगू व मोसीन यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. या परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी परिसरास वेढा देऊन शोधमोहीम सुरू केली होती.

Advertisements

Related Stories

बळजबरीने कुणाचं भलं करतात का?

Patil_p

उत्तर प्रदेश : बेकायदा दारू विक्री विरोधात विशेष मोहीम

pradnya p

सहकाऱयाच्या गोळीबारात जवानाचा मृत्यू

Patil_p

मणिपूरमध्ये लष्कराच्या जवानांवर दहशतवाद्यांचा घातकी हल्ला; 3 जवानांना वीरमरण

pradnya p

पंतप्रधान कर्ज योजनांच्या नावाने बनावट ऍप्लिकेशन

Patil_p

भीमा कोरेगाव प्रकरणी स्टॅन स्वामी यांना अटक

Patil_p
error: Content is protected !!