तरुण भारत

गोलंदाजी करण्यासाठी होल्डर सज्ज

वृत्तसंस्था / मँचेस्टर

विंडीजचा कर्णधार जेसन होल्डर आता पूर्णपणे तंदुरूस्त झाला असून तो चार दिवसांच्या सरावाच्या सामन्यात गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झाला असल्याची माहिती विंडीजचे प्रमुख प्रशिक्षक फिल सिमन्स यांनी दिली आहे. विंडीज आणि इंग्लंड यांच्यातील पहिली कसोटी 8 जुलैपासून खेळविली जाणार आहे.

Advertisements

काही दिवसांपूर्वी होल्डरच्या घोटय़ाला दुखापत झाली होती. तीन दिवसांच्या  सरावाच्या सामन्यातील गुरूवारी शेवटच्या दिवशी होल्डरने गोलंदाजी करण्याचा धोका पत्करला नाही. पण आता होणाऱया चार दिवसांच्या सरावाच्या सामन्यात तो पुन्हा गोलंदाजी करण्यासाठी पूर्ण तंदुरूस्त असल्याचे प्रशिक्षक सिमन्सने सांगितले. हा सरावाचा सामना ओल्ड ट्रफोर्ड मैदानावर शुक्रवारपासून सुरू होत आहे. गेल्या मार्चनंतर जवळपास तीन महिन्यांच्या कालावधीनंतर ही पहिली द्विपक्षीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका खेळविली जात आहे. विंडीज संघातील वेगवान गोलंदाज गॅब्ा्रियल हा आता पूर्णपणे तंदुरूस्त झाला असून त्याचे  पहिल्या कसोटीत पुनरागमन होत आहे.

Related Stories

फातोडर्य़ात आज रंगणार एफसी गोवा-जमशेदपूर संघात लढत

Omkar B

ऑक्टोबरमध्ये टी-20 विश्वचषक भरवणे अव्यवहार्य

Patil_p

देशभरात ऑनलाईन क्लासेसची चलती : माजी क्रिकेटपटू शिवरामकृष्णन

Patil_p

ऑस्ट्रेलिया ओपनसाठी क्वारंटाईन स्थळामध्ये बदल

Patil_p

‘यंग ब्रिगेड’मुळे आशाअपेक्षा उंचावल्या

Patil_p

भारतीय नेमबाजांकडून निराशा

Patil_p
error: Content is protected !!