तरुण भारत

विश्व सांघिक टेनिसमध्ये व्हिनस दाखल

वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क

अमेरिकेची अनुभवी आणि वयस्कर महिला टेनिसपटू व्हिनस विल्यम्सने विश्व सांघिक टेनिसमध्ये सहभागी होणार असल्याचे स्पर्धा आयोजकांनी सांगितले. विश्व सांघिक टेनिस स्पर्धेत व्हिनस 15 व्यांदा आपला सहभाग दर्शवित आहे. अलिकडेच व्हिनसने या स्पर्धेत सहभागी होण्याचा करार केला आहे. 12 जुलैपासून या विश्व सांघिक टेनिस स्पर्धेला प्रारंभ होत आहे.

सदर स्पर्धा तीन आठववडे चालणार असून व्हिनस विल्यम्स वॉशिंग्टन कॅसल्स संघाचे प्रतिनिधीत्व करीत आहे. या स्पर्धेत एकूण 9 संघांचा समावेश आहे. गेल्या आठवडय़ात व्हिनसने 40 व्या वर्षात पदार्पण केले आहे. तिने आतापर्यंत सातवेळा ग्रॅन्डस्लॅम एकेरीचे अजिंक्यपद मिळविले असून त्यापैकी  पाचवेळा विम्बल्डन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेत एकेरीचे जेतेपद पटकाविले आहे. तिने दोनवेळा अमेरिकन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेत  एकेरीचे अजिंक्यपद घेतले आहे. व्हिनसने आपली लहान बहिण सेरेना समवेत दुहेरीतील चौदा ग्रॅन्डस्लॅम अजिंक्यपदे मिळविली आहेत. 12 जुलैपासून खेळविल्या जाणाऱया या स्पर्धेवेळी शौकीनांच्या संख्येवर नियंत्रण घालण्यात आले आहे. सामन्यावेळी 200 शौकीन आणि 50 स्टाफ मेंबर्स यांना परवानगी देण्यात आली आहे.

Related Stories

राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा पुढील वषी होण्याची शक्यता

Patil_p

तामिळनाडू अंतिम फेरीत दाखल

Patil_p

बुमराहच्या विवाह सोहळय़ासाठी फक्त 20 निमंत्रित!

Patil_p

ऑस्ट्रेलियाविरुद्ध न्यूझीलंडचा पुन्हा फडशा

Patil_p

ऍथेन्स मॅरेथॉन रद्द

Patil_p

स्टोक्सचा इंग्लंडतर्फे सर्वाधिक झेल टिपण्याचा विक्रम

Patil_p
error: Content is protected !!